आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Srilanka\'s Ranking In Dengar Zone Against Bangladesh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बांगलादेशविरुद्ध श्रीलंकेचे अव्वल स्थान पणाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ट्वेंटी-20 क्रिकेट जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेशविरुद्ध रविवारी होणा-या एकमेव ट्वेंटी-20 क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचे अव्वल स्थान पणास लागले आहे. क्रमवारीत सध्या प्रथम क्रमांकावर असलेला श्रीलंका संघ आणि बांगलादेश संघ यामध्ये 47 गुणांचा फरक आहे. त्यामुळे रँकिंगनुसार श्रीलंका संघ विजयी होणार असा अंदाज आहे. या विजयामुळे श्रीलंका संघाला अवघ्या एका गुणाचाच लाभ होईल. मात्र तळाला असलेल्या बांगलादेशकडून श्रीलंका संघाला पराभवाचा धक्का बसला तर तो धक्का अपयशापेक्षाही मोठा असेल. कारण त्या पराभवामुळे श्रीलंकेचे पाच गुण वजा होतील. तसे झाल्यास सध्या दुस-या क्रमांकावर असलेला वेस्ट इंडीज संघ अव्वल स्थानावर येईल. श्रीलंके विरुद्ध पराभवामुळे बांगलादेशची नवव्या स्थानावरून आणखी एक स्थान खाली घसरगुंडी होईल व आयर्लंड नववे स्थान पटकावेल.


ट्वेंटी-20 क्रमवारी
क्रम देश गुण
1 श्रीलंका 131
2 वेस्ट इंडीज 126
3 भारत 119
4 पाकिस्तान 119
5 इंग्लंड 118
6 द. आफ्रिका 114
7 ऑस्ट्रेलिया 102
8 न्यूझीलंड 98
9 बांगलादेश 84

10 आयर्लंड 82
11 झिम्बाब्वे 41