आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Srinivas Can Take BCCI Charge, Say Supreme Court

श्रीनिवासन यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, कामकाजास दिली सशर्त परवानगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गेल्या अनेक दिवसांपासून अनेक अडचणींचा सामना करणा-या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना अखेर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना न्यायालयाने अध्यक्षपदाच्या कामकाजास सशर्त परवानगी दिली आहे. आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणापासून दूर राहून श्रीनिवासन यांना अध्यक्षपद सांभाळण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.


स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर गुरुनाथ मयप्पनवर केलेल्या आरोपामुळे श्रीनिवासन यांनी तात्पुरते अध्यक्षपदाचे प्रशासकीय काम थांबवले होते. त्यानंतर न्यायालयाने आयपीएलपासून दूर राहून कामकाज करण्याचे आदेश दिले होते. त्यांची 29 सप्टेंबर रोजी बीसीसीआयच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, ते पदभार स्वीकारू शकले नाही.


बीसीसीआयचे नवनियुक्त सचिव संजय पटेल म्हणाले की, आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश आणि निर्णयाचे स्वागत करत आहोत. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. ‘आम्ही एकमताने अध्यक्षपदी त्यांची निवड केली आहे. प्रशासकाच्या रूपाने त्यांच्यातील क्षमतेवर सदस्यांचा विश्वास आहे,’ असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले.