आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडळात दुस-या इनिंगसाठी श्रीनिवासन पॅड घालून सज्ज !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘बीसीसीआय’मधील स्ट्राँग मॅन एन. श्रीनिवासन यांनी पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटचा ताबा घेतला असून येत्या 29 सप्टेंबरला होणा-या वार्षिक सर्वसाधारण सभेत आणि त्या वेळी होणा-या निवडणुकांवर वर्चस्व गाजविण्यासाठी ते सिद्ध झाले आहेत. आगामी वर्षभराचा उर्वरित कालावधी पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.


त्यांनी बुधवारी मुंबईतील बीसीसीआयच्या वानखेडे स्टेडियमवरील मुख्यालयात येऊन दिवसभर मुक्काम केला आणि वार्षिक सभेपूर्वीची सर्व कामे हातावेगळी केली. भावी निवडणुकीच्या धामधूमीत व्यग्र असणा-या अरुण जेटली यांनी या वेळी त्यांना निवडणुकीत रस नसल्याचे संकेत दिले आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये असल्यामुळे अध्यक्षपदी निवड झाल्यास शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यताही नष्ट झाली आहे. अन्य संघटनांपैकी कुणी पवारांना सभेवर जाण्याची संधी दिली तरच उत्सुकता वाढेल. मात्र तशी शक्यता सध्या तरी दिसत नाही. श्रीनिवासन यांच्या पाठीशी तब्बल 24 ते 25 संघटना उभ्या आहेत. विरुद्ध 6 आहेत. मुंंबईतील सीसीआयसारख्या पश्चिम विभागीय संघटनेनेदेखील श्रीनिवासन यांनाच पाठिंबा दर्शविल्याचे कळते. त्यामुळे 29 तारखेला श्रीनिवासन यांच्या विरोधात कुणी जाण्याची शक्यता दिसत नाही.


श्रीनिवासन यांची भुमिका
श्रीनिवासन यांनी आगामी वर्षासाठी कारभार करण्याची जबाबदारी घेतल्यास विद्यमान सचिव आणि कोशाध्यक्षदेखील तेच राहतील, असा अंदाज आहे. संजय जगदाळे व अजय शिर्के यांनी अचानक राजीनामा देऊन विश्वासघात केल्यानंतर पाठीशी उभ्या राहिलेल्या सदस्यांवर श्रीनिवासन यांनी या वेळी पूर्ण विश्वास टाकण्याचे ठरविले आहे, असे कळते.