आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Srinivasan, 12 Players Named In Mudgal Report: SC

आयपीएलमधील गैरव्यवहार प्रकरण : श्रीनिवासनसह बारा खेळाडूंवर आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार्‍या एन. श्रीनिवासन यांच्याविरुद्ध कोर्टाने चौकशीचे आदेश दिले आहे. आयपीएल-6 मधील फिक्सिंगचा तपास करणार्‍या मुद्गल समितीच्या अहवालात 12 खेळाडूंसह 13वे नाव श्रीनिवासन यांचे आहे, हे आरोप बघता त्यांच्याकडे डोळेझाक करता येऊ शकत नाही, असे कोर्टाने सांगितले.

कोर्टाने गेल्या महिन्यात श्रीनिवासन यांना बीसीसीआय अध्यक्षपदावरून हटवले होते. या निर्णयाविरुद्ध श्रीनिवासन यांनी मंगळवारी कोर्टाकडे फेरविचार याचिका दाखल केली. कोर्टाने सांगितले, मुद्गल समितीनुसार श्रीनिवासन यांच्यासमोर सर्व आरोप आणले. मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही.