आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Srinivasan Elected TNCA President For 12th Straight Time

श्रीनिवासन यांची सलग 12व्‍यांदा निवड, तामिळनाडूत पुन्‍हा एक हाती सत्ता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्‍नई- स्‍पॉट फिक्सिंगप्रकरणी वादात अडकलेले भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्‍यक्ष एन श्रीनिवासन यांची रविवारी तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्‍या (टीएनसीए) अध्‍यक्षपदी सलग 12व्‍यांदा निवड झाली आहे.

टीएनसीएच्‍या 83व्‍या सर्वसाधारण बैठकीत बीसीसीआयचे अध्‍यक्ष श्रीनिवासन यांची बिनविरोध निवड करण्‍यात आली. तर काशी विश्‍वनाथ यांचीही सलग सातव्‍यांदा सचिवपदी निवड झाली आहे. टीएनसीएने दिलेल्‍या निवेदनानुसार सर्व पदाधिका-यांची निवड ही बिनविरोध झाली आहे. या निवडीमुळे श्रीनिवासन यांच्‍या टीएनसीएमधील एकहाती सत्तेला पुन्‍हा एकदा बळ मिळाले आहे. वादाच्‍या पार्श्‍वभूमीमुळे टीएनसीएच्‍या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते.