नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी आयपीएल-६ च्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची सुनावणी केली. मात्र, त्याने लिफाफा बंद असलेल्या या मुदगल समितीच्या अहवालाबाबत कोणत्याही प्रकारचा खुलासा केला नाही. यातून आयसीसीचे अध्यक्ष श्रीनिवासन यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणावर येत्या १४ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मुदगल समितीच्या अहवालात नावांऐवजी सांकेतिक भाषेचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे आता शुक्रवारी होणा-या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तीन नोव्हेंबर रोजी मुदगल समितीने आयपीएलमधील फिक्सिंग प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल सादर केला आहे. यावर न्यायाधीश टी.एस.ठाकूर आणि फकीर मोहंमद इब्राहिम कलीफुल्ला यांच्या खंडपीठाने सुनावणी केली. ‘आम्ही हा अहवाल पूर्णपणे वाचला नाही. यासाठी थोडा वेळ पाहिजे, अशी प्रतिक्रिया खंडपीठांच्या न्यायाधीशांनी या वेळी दिली. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी सुरू असलेली सुनावणी स्थगित केली. अहवालात व्यक्तीच्या नावाऐवजी सांकेतिक
भाषेचा वापर करण्यात आल्याचे राजू यांनी सांगितले.