आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीआय प्रमुख श्रीनिवासनांचा उलट प्रवास सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयाने श्रीनिवासन यांना निष्पक्ष चौकशीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपद सोडण्याचे सांगितले आहे. श्रीनिवासन यांचे मालकीहक्क असलेला चेन्नई सुपरकिंग्ज संघ आयपीएलमध्ये सहभागी झालेला आहे. या टीमचे प्रिंसिपल गुरुनाथ मयप्पनवर मॅच फिक्सिंगमध्ये सक्रिय असल्याचा आरोप आहे. मयप्पन हा श्रीनिवासन यांचा जावई आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मॅच फिक्सिंग प्रकरणाची तपासणी नि:पक्षपणे करण्यासाठीच श्रीनिवासन यांना पद सोडण्याचे सांगितले. त्यामुळे ते लवकरच आपले पद सोडू शकतात.

शिवलाल असणार अंतरिम अध्यक्ष!
श्रीनिवासन यांच्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून शिवलाल यादव यांची नियुक्ती केली जाऊ शकते. यादव सध्या बीसीसीआयचे उपाध्यक्ष आहेत. तसेच जगमोहन दालमियांकडेही जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तेदेखील संकटमोचकाची भूमिका पार पाडू शकतात. तसेही आगामी सप्टेंबरमध्ये बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. या वेळेस पूर्व विभागाला संधी आहे. विचार केल्यास हा विभाग दक्षिण विभागाकडून निवडणुकीतून माघारही घेऊ शकतो. या विभागाची भूमिका ही आता श्रीनिवासन यांच्याविरुद्ध न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरच अंवलबून आहे.

आयसीसी बोर्डच्या अध्यक्षपदाचे काय?
याच वर्षी जुलैत श्रीनिवासन हे आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रेही स्वीकारणार आहेत. बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडल्यानंतर श्रीनिवासन यांच्या आयसीसीच्या नेतृत्वावर काहीही फरक पडणार नाही. मात्र, न्यायालयाने याप्रकरणी दोषी ठरवल्यास श्रीनिवासन यांना आयसीसीचे हातचे पद गमावावे लागेल. आता काहीही तर्क काढणे कठीण आहे. मात्र, तर्क काढला जाऊ शकतो. तसेही आता श्रीनिवासन हे बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारणार नाहीत. कारण, आता पूर्व विभागाची संधी असेल.

मुदगल समिती श्रीनिवासनांना मानते दोषी
मुदगल समिती ही मयप्पनच्या गैरव्यवहारासाठी चेन्नई सुपरकिंग्जचे मालक एन. श्रीनिवासन यांनाच दोषी मानत आहे. प्रत्येक अधिकारी हा बीसीसीआयच्या नियमाचे पालन करतो की नाही, हे त्यांनी निश्चित करायला हवे होते. शेवटी श्रीनिवासन यांच्यासमोरील अडचणी कमी होणार नाहीत.