आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Srinivasan, Meiyappan Not Guilty In Match Fixing Scam, Panel Tells SC

फिक्सिंगमध्ये श्रीनि नसल्याचा खुलासा, गुरुनाथ, शिल्पाचा पती राज निघाले सट्टेबाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- एन. श्रीनिवास, मयप्पन आणि राज कुंद्रा.)
नवी दिल्ली- आयपीएल स्पॉट फिक्सिंग तपासणी अहवालातील ३५ पाने सोमवारी सार्वजनिक करण्यात आली. यात क्रिकेटचे प्रमुख एन. श्रीनिवासन यांना क्लीन चिट देण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती आहे. चार दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने श्रीनिवासन यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे असल्याचे म्हटले होते. मात्र, सध्या जो अहवाल सार्वजनिक झाला आहे त्यात श्रीनि स्पॉट फिक्सिंगमध्ये सामील नसल्याची माहिती असून त्यांचा जावई गुरुनाथ मयप्पन आणि शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचे सट्टेबाजांशी संबंध असल्याची माहिती आहे. इतकेच नव्हे तर आयपीएलचे सीओओ सुंदर रमण हेसुद्धा सट्टेबाजांच्या संपर्कात होते. एका बुकीशी त्यांची वेळा चर्चा झाल्याचे यात नमूद आहे.

तीन गोष्टी स्पष्ट झाल्या..
श्रीनिवासनबीसीसीआयची निवडणूक लढतील. पुन्हा अध्यक्षपदी निवड होऊ शकते. मंडळाने मंगळवारी यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे.

चेन्नई, राजस्थान संघाची मान्यता धोक्यात. आयपीएल नियमानुसार संघाचे मालक किंवा पदाधिकारी सट्टेबाजीत सामील झाल्यास संघाची मान्यता रद्द होईल. मयप्पन (चेन्नई संघाचा मालक) राज कुंद्रा (राजस्थान टीम) हे दोघे सट्टेबाजीत दोषी.

आयपीएलची ब्रँड इमेज कोसळली. कारण आयपीएलचा सीओओच सट्टेबाज निघाला. सुंदर रमण याला वाचवण्यासाठी श्रीनिंनी आपली पूर्ण ताकद लावली होती.

२४ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. खेळाडू, अधिकाऱ्यांच्या नावांचा खुलासा होऊ शकतो.

अहवालातील दोषींचे नंबर
श्रीनिवासन नंबर १३ : फिक्सिंग,सट्टेबाजीचा पुरावा नाही. एक खेळाडू चुकीचे कार्य करीत असल्याची माहिती होती. मात्र, काहीच केले नाही. जावयाकडेही दुर्लक्ष केले.

चौकशीत दोन खेळाडू रडले
मुदगलसमितीच्या चौकशीत दोन खेळाडू रडले होते. आपले नाव अहवालात आले तर करिअर संपेल, अशी विनंती त्यांनी केली होती. यापैकी एक वेगवान गोलंदाज असून दुसरा अष्टपैलू आहे. यातील एक २०११ च्या वर्ल्डकप विजेत्या संघात सामील होता.

कुंद्रा नंबर ११ : राजस्थानरॉयल्सचा सहमालक. सट्टेबाजांशी बोलायचा. मात्र, चौकशीत नकार दिला. पुरावे मिळाले. राजस्थान पोलिसांनी चौकशी संपवण्याची घाई केली.

सुंदर रमण नंबर १२ : आयपीएलसीओओ. सट्टेबाजाशी वेळा चर्चा. मयप्पन, कुंद्रा सट्टेबाजी करीत असल्याचे आयसीसी अँटी करप्शन युनिटने म्हटल्यानंतरही सुंदर रमणने कारवाई केली नाही.

मयप्पन नंबर : श्रीनिवासनचाजावई. सट्टेबाजीत सामील. हॉटेलात सट्टेबाजांशी भेट. मात्र, फिक्सिंगचे पुरावे नाहीत. चेन्नई संघाचा मालक. मंडळाच्या चौकशीत क्लीन चिट.

यासंदर्भात विंदू दारासिंग काय म्हणाला, वाचा पुढील स्लाईडवर...