आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीनिवासन आयसीसी बोर्डाच्या अध्‍यक्षपदी होणार विराजमान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंगापूर - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे एन. श्रीनिवासन यांचा जून 2014 पासून आयसीसी बोर्डाच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आयसीसीच्या ढाच्यात बदल करण्याच्या निर्णयावर दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि श्रीलंका क्रिकेट मंडळाने अद्याप कोणत्याही प्रकारची सहमती दर्शवली नाही. तरीही सिंगापूरच्या बैठकीत श्रीनिवासन यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शनिवारी सिंगापूर येथे आयसीसीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत अर्थ आणि व्यावसायिक प्रकरणी समितीची स्थापना करण्यात येईल. यात बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट मंडळासह याचे पाच सदस्य असतील.
श्रीनिवासन यांना आयसीसी बोर्डाच्या अध्यक्षपदी प्रथमच विराजमान होण्याचा मान मिळणार आहे. तसेच कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी ऑस्ट्रेलियाच्या प्रतिनिधीची निवड केली जाईल. त्यापाठोपाठ अर्थ आणि व्यावसायिक समितीच्या नेतृत्वाची सूत्रे इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट मंडळाच्या प्रतिनिधीकडे सोपवण्यात येतील.
आयसीसीच्या ढाच्यात बदल करण्याच्या निर्णयाचे सर्वाधिक अधिकार भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला मिळणार आहेत. मात्र, यासाठी बोर्डाच्या 10 पैकी आठ सदस्यांची मंजुरी आवश्यक असेल. मात्र, बिग थ्रीसमोर (भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड) दक्षिण आफ्रिका, श्रीलंका क्रिकेट मंडळाचे सदस्य नमतील, अशी चर्चाही केली जात आहे.