आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरी परतलेल्या श्रीसंतला भारतीय क्रिकेटसंघात पुनरागमनाचा विश्वास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोची - निर्दोष असल्याचा दावा आणि न्यायसंस्थेवर विश्वास ठेवताना वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतने बुधवारी राष्‍ट्रीय संघात पुनरागमनाची आशा व्यक्त केली. मीडियाशी बोलताना तो म्हणाला की मी हमी देतो की मी कधीही आशा सोडणार नाही.


त्रिपुनिथुरा येथे आई-वडील आणि नातेवाइकांशी भेट घेतल्यानंतर श्रीसंत पत्रकारांशी म्हणाला, ‘क्रिकेट खेळत राहणे हे माझे स्वप्न आहे. मला फक्त क्रिकेट खेळत राहायचे आहे. संघात पुनरागमन करण्याची इच्छा आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यात खेळण्याचे माझे स्वप्न आहे. मात्र, सध्या याबाबत काहीच निश्चित नाही.’


तिहार जेलमध्ये काढलेल्या दिवसांबाबत विचारले असता श्रीसंतने यावर काहीही बोलण्यास नकार दिला. तो म्हणाला, ‘मी फक्त इतके म्हणू शकतो की या खेळावर माझे प्रेम आहे. मी जेव्हापासून खेळण्यास सुरुवात केली, तेव्हापासून मी सर्वश्रेष्ठ प्रयत्न केले. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. माझा न्यायसंस्थेवर पूर्ण विश्वास आहे. सर्व काही सुरळीत होण्याची प्रतीक्षा मी करीत आहे. निश्चितपणे सर्व माहिती देण्यास इच्छुक आहे.’


मला क्रिकेटच्या दुनियेतून समर्थन मिळत आहे. सर्वांचे संदेश येत आहेत. त्यांचे आभार. राजस्थान रॉयल्स, बीसीसीआय, माझे कुटुंब आणि चाहत्यांचे आभार. माझी कोणाविरुद्धच तक्रार नाही. सर्वजण आपले काम करीत आहेत, असेही तो म्हणाला.