आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्सिंग लिजेंड मोहम्मद अलीची चॅम्पियन मुलगी झाली 36 वर्षांची

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेची निवृत्त बॉक्सर लैला अली आज (सोमवार) 36वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉक्सिंगमधील लिजेंड मोहम्मद अली आणि त्याची तिसरी पत्नी व्हेरॉनिका पोर्श यांची मुलगी लैलाने पित्याच्या लौकिकाला साजेसे बॉक्सिंगमध्ये नाव कमावले.
बॉक्सिंग हा खेळ तसा पुरुषांच्या ताकदीशी जोडला जातो मात्र, या धोकादायक खेळात एखाद्या महिलेने नाव कमावावे ही मोठी गोष्ट आहे. वयाच्या 18 व्या वर्षापासून लैलाने बॉक्सिंगच्या करिअरला सुरुवात केली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जूनकडून ज्या प्रमाणे सर्वोत्कृष्ट खेळाची अपेक्षा केली जाते तिशीच परिस्थिती लैलाबाबत देखील होती. वडीलांच्या नावलौकिकाला साजेल असा खेळ करण्याचे आव्हान तिच्यापुढे होते. मात्र यामुळे ती घाबरली नाही.
बॉक्सिंग कारकिर्दीत एकही लढत न हारणा-या महिला बॉक्सर्सच्या क्लबमध्ये लैलाचे नाव आहे. तिने कारकिर्दीत 24 फाइट खेळल्या असून 24 ही जिंकल्या आहेत.
लैलाने आता बॉक्सिंगमधून निवृत्ती स्विकारली आहे. ती आता पती कर्टिस कॉनव्हे आणि दोन मुलांसह राहाते. तिचा मोठा मुलगा कर्टिस मोहम्मद कॉनव्हे ज्युनिअरचा जन्म 26 ऑगस्ट 2008 रोजी झाला. त्यानंतर एप्रिल 2011 मध्ये तिला मुलगी झाली तिचे नाव सिडनी आहे.
ठोशे आणि मारामारीचा खेळ खेळूनही लैला कोमल ह्रदयाची आहे. रेसलिंग लिंजेड हल्क होगनने त्याचा जीव वाचवण्याचे श्रेय लैलाला दिले आहे. तो जेव्हा मृत्यूशी झुंज देत होता तेव्हा लैलाने त्याला फोन करुन आयुष्यातील कठीण प्रसंगाचा सामना केला पाहिजे अशी उभारी दिली होती आणि मृत्यूशी लढा देण्याची जिद्द त्याच्यात जागवली होती.
लैलाच्या वाढदिवसानिमीत्त आज आम्ही तुम्हाला तिच्या आयुष्यातील आठवणीतील छायाचित्र घेऊन आलो आहोत...