आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्याच लढतीत शेराचा धडाकेबाज विजय; दाेन मिनिटांत मारली बाजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयाॅर्क- भारताचा स्टार मल्ल महाबली शेराने टाेटल नाॅन स्टाॅप अॅक्शनमध्ये (टीएनए) दमदार सुरुवात केली. त्याने अापल्या पहिल्याच लढतीत टायगर उनाेला धूळ चारली. त्याने दाेन मिनिटांत कुस्ती जिंकून पंजाबचा दबदबा कायम ठेवला. नुकतीच २६ जानेवारी राेजी ही लढत साेनी वाहिनीवर प्रसारित करण्यात अाली. माेहालीत त्याच्या कुटंुबीयांना या लढतीविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली हाेती. शेराने क्षणार्धात उनाेला जमिनीवर पाडले. या वेळी पंचांनी शेराला विजयी घाेषित केले.