आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Star Players Should Play In National Competation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्टार खेळाडूंना राष्‍ट्रीय स्पर्धेत खेळण्याची सक्ती, बॉक्सिंग फेडरेशनचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड - खेळाडू स्टार झाले की राष्‍ट्रीय स्पर्धेत दिसत नाहीत.भारतामध्ये ही अडचण जवळजवळ प्रत्येक खेळांमध्ये आहे. बॉक्सिंगही यामध्ये मागे नाही. मात्र, यापुढे विजेंदर सिंग असो की मनोजकुमार, प्रत्येक भारतीय बॉक्सरला वरिष्ठ राष्‍ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये खेळावे लागेल.


अखिल भारतीय बॉक्सिंग फेडरेशनने नुकत्याच जाहीर केलेल्या आदेशात हे स्पष्ट केले आहे. आगामी ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील राष्‍ट्रीय स्पर्धांसाठी हा नियम लागू असेल. या स्पर्धेत सहभागी न होणा-या खेळाडूला राष्‍ट्रीय संघाच्या प्रशिक्षण शिबिरात प्रवेश मिळणार नाही. पुरुषांसह महिला गटातही हा नियम लागू करण्यात आला आहे. फेडरेशनच्या मते, राष्‍ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये युवा व स्टार खेळाडूंमधील सामन्यामुळे स्पर्धाचा दर्जा उंचावेल.


फेडरेशनसमोर स्टार खेळाडूंचे आव्हान
मागील काही वर्षांपासून भारतीय बॉक्सर आंतरराष्‍ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करत आहेत. दुसरीकडे अधिकाधिक वेळ राष्‍ट्रीय प्रशिक्षण शिबिरामुळे हे खेळाडू नॅशनल स्पर्धेत सहभागी होत नाहीत. अशात राष्‍ट्रीय चॅम्पियनशिपसाठी नियम तयार करण्यात आले. मात्र, यामध्ये किती स्टार खेळाडू सहभागी होतील, हे येणारा काळच सांगू शकेल. जर एखादा मोठा बॉक्सर राष्‍ट्रीय स्पर्धेत अनुपस्थित राहिला तर दुस-या खेळाडूला फेडरेशनविरुद्ध जाण्याची संधी मिळेल. महिलांमध्ये दोन खेळाडूंनी राष्‍ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता.