आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पद्मभूषण' पुरस्कारासाठी नामांकन न झाल्याने सायना नाराज, क्रीडा मंत्रालयावर आगपाखड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलराणी सायना नेहवाल हिचे नाव पद्म भूषण पुरस्कारासाठी नामांकित न झाल्याने ती नाराज असल्याचे कळते. ऑलिम्पिकमध्ये ब्रॉंझ पदक विजेती शटलर सायनाने सोशल साइटवर स्पोर्टस् ऑथरिटी ऑफ इंडिया (साई) आणि क्रीडा मंत्रालयाबद्दल रोष व्यक्त केला आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने पैलवान सुशीलकुमारची पद्म भूषण पुरस्कारासाठी नाव सुचविले आहे. ऑक्टोबरमध्ये बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने क्रीडा मंत्रालयाला या पुरस्कारासाठी सायनाचे नाव पाठविले होते, मात्र मंत्रालयाने सुशीलकुमारचे नाव पुढे केले आहे.
हे आहे रोषाचे खरे कारण
2011 मध्ये पद्मश्रीने सन्मानित सुशीलकुमारने 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य आणि 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये रजत पदक जिंकले असताना क्रीडा मंत्रालयाने 2012 मध्ये पुद्मभूषण पुरस्कारासाठी नाव सुचविले होते. मात्र, गृहमंत्रालयाच्या नियमांचा हवाला देत अखेरच्या यादीतून त्याचे नाव कमी करण्यात आले होते. तर, 2010 मध्ये सायना नेहवालला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यंदा तिच्या या पुरस्कराला पाच वर्षे पूर्ण होत आहेत.
पद्म पुरस्कारांमध्ये पाच वर्षांचे अंतर गरजेचे
पद्म पुरस्कारांच्या नियमानुसार एका व्यक्तीला दोन पद्म पुरस्कार मिळण्यात पाच वर्षांचे अंतर असले पाहिजे. यानुसार सुशीलकुमारला 2016 आधी पुन्हा पद्म पुरस्कार मिळू शकत नाही. मात्र मंत्रालयाचे म्हणणे आहे, की विशेष बाब म्हणून सुशीलकुमारला पुरस्कार मिळू शकतो.
सायनाचे ट्विट
- आज वृत्तपत्रात क्रीडा मंत्रालयाकडू पद्म भुषण पुरस्कारासाठी पाठवण्यात आलेल्या नावांमध्ये माझे नाव नाही हे वाचल्यानंतर खूप दुःख झाले.
- 2010 मध्ये पद्मश्री पुरस्काराने मला सन्मानित केले गेले होते. पद्म पुरस्कारांच्या नियमानुसार पाच वर्षांनंतर मला पद्म भुषण पुरस्कार मिळू शकतो.