आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Boxing Gold Medalist Rishu Mittal Working As A Maid

SHAME: सुवर्णपदक विजेती Boxer खेळाडू घराघरांत मारतेय झाडू-पोछा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घराघरात परशी पुसताना हरियाणाची बॉक्सर रिशू मित्तल. - Divya Marathi
घराघरात परशी पुसताना हरियाणाची बॉक्सर रिशू मित्तल.
कॅथल- एकीकडे आपल्या देशातील क्रिकेटर कोट्यावधी रूपये कमावत आहेत. इतर खेळातही भारत वेगाने प्रगती करीत आहे. तर दुसरीकडे, एक वास्तव आम्हाला शरमेने मान खाली घालवत आहे. 16 वर्षीय हरियाणाची बॉक्सर व सुवर्णविजेती खेळाडू रिशु मित्तल हिला घराघरांत मोलकरणीचे काम करून जगावे लागत आहे. रिशू घराघरांत झाडू-पोछा मारत आहे. रिशू हरियाणातील कॅथल गावात राहते. तिने गेल्यावर्षी राज्य बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
रिशु सांगते की, मी सकाळ-संध्याकाळ खूप कष्टाने व मेहनतीने बॉक्सिंगचा सराव करते. प्रशिक्षकाच्या मदतीने आणि अथक परिश्रम घेतल्यामुळेच राज्य चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकले होते. रिशु मित्तल खूपच गरीब परिवारातील आहे. तिच्याजवळ दूध, दही, पनीर आणि फळे खाण्यासाठीचे सोडा तर रोजचे जेवण करण्याएवढेही पैसे नाहीत. बॉक्सिंग क्षेत्रातील मान्यवरांचे म्हणणे आहे की, रिशू मित्तल ला जर चांगला व सकस आहार मिळाला तर ही देशातील दुसरी ‘मेरी कॉम’ बनू शकते.
46 किलो वजनी गटात मिळवले होते विजेतेपद-
रिशुने सप्टेंबर 2014 मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत 46 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे. डिसेंबर 2014 मध्ये तिने ग्वालियर येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत हरियाणाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यापूर्वी 2013 मध्ये फरीदाबाद आणि 2012 मध्ये भिवानी येथे झालेल्या राज्य स्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत कांस्य पदक मिळवले होते.
पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा, रिशू मित्तल ची आणखी PHOTOS...