आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळाडूला एकाच संघाची सक्ती; राज्य कबड्डी संघटनेचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्य संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये स्पर्धा सुरू होण्याच्या हंगामात एखादा खेळाडू एका वर्षात आता केवळ एकदाच संघ बदली करू शकणार आहे.

स्थानिक खेळाडूला नोंदणी झाल्यावर वर्षभर त्याच संघाकडून खेळावे लागेल. संघ बदलीसाठी खेळाडूंवर दबाव टाकला जातो व काही वेळा नोकरीचे आमिष दिले जाते. अशा प्रकारामुळे सतत संघ बदलणाºया खेळाडूंवर टाच आणण्यात आली आहे. त्याचप्रमाणे भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी गैरप्रकार करणार्‍या खेळाडूंची चौकशी करून कडक कार्यवाही करण्यात येणार आहे. सभेस कार्याध्यक्ष डॉ. दत्ता पाथ्रीकर, सचिव रमेश देवाडीकर, शांताराम जाधव उपस्थित होते.