आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय सबज्युनियर ज्युदो स्पर्धेत मुंबईच्या संघाने पटकावले विजेतेपद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) येथे आयोजित 41 व्या राज्यस्तरीय सबज्युनियर ज्युदो स्पर्धेत मुंबईच्या संघाने विजेतेपद पटकावले. ठाण्याचा संघ उपविजयी ठरला. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणा-या औरंगाबादच्या सुप्रिया जंगमे आणि मुलांमध्ये अहमदनगरच्या आदित्य धोपावकरला बेस्ट ज्युदोका पुरस्कार देण्यात आला.


स्पर्धेत 24 जिल्ह्यांतील 353 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या वेळी गतवर्षी राष्‍ट्रीय स्पर्धेत पदक पटकावलेल्या खेळाडूंचा आंतरराष्‍ट्रीय तिरंदाज संदीपकुमार आणि माजी राष्‍ट्रीय खेळाडू राजीव देव यांच्या हस्ते रोख बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी राज्य संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. धनंजय भोसले, सचिव दत्ता आफळे, रत्नाकर पटवर्धन, शैलेश टिळक, सतीश पहाडे, रवी मेतकर, विजय पाटील, सुरेश कपाडिया, डॉ. गणेश शेटकर यांची उपस्थिती होती.


चार खेळाडूंची राष्‍ट्रीय स्पर्धेसाठी निवड
स्पर्धेत यजमान संघाने एकूण 15 पदके पटकावली. यामध्ये 3 सुवर्ण, 4 रौप्य आणि 8 कांस्यपदकांचा समावेश आहे. सुप्रिया जंगमे, प्रियंका गुप्ता, विशाखा गुप्ता व काजल मेढेची राष्‍ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. काजल मेढे, अमित गायकवाड, अजिंक्य मते आणि आशिष मारणेने रौप्यपदके पटकावली. अश्विनी जमालपुरे, विशाखा गुप्ता, रोहिणी बोराडे, समीक्षा काटकर, विजय मुंढे, अंकुश दळवी, अजय तुपे आणि आदित्य कुलकर्णीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. यातील 11 खेळाडू हे बजाजनगर ज्युदो प्रशिक्षण केंद्राचे आहेत.


सुप्रियाची दुस-यांदा प्रतीक्षावर मात
सुप्रिया जंगमेने स्पर्धेत 13 वर्षांखालील 30 किलो वजन गटात सुवर्ण कामगिरी साधली. तिने राज्य स्पर्धेत दुस-यांदा सांगलीच्या प्रतीक्षा पाटीलवर मात केली. गत वर्षीही सुप्रियाकडून प्रतीक्षाला पराभूत व्हावे लागले होते.