आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • State Ranking Tennis Computation News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्य रँकिंग टेनिस स्पर्धा: अथर्व, आर्यंकाला विजेतेपद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुंबई येथे झालेल्या राज्य रँकिंग टेनिस स्पर्धेत 10 वर्षांखालील गटात औरंगाबादचे प्रतिनिधित्व करणार्‍या नंबर वन मानांकित टेनिसपटू अथर्व शिंदे आणि आर्यंका काडेने विजेतेपद पटकावले. राज्य क्रमवारीतदेखील हे दोन्ही एमएसएलटीए मराठवाडा टेनिस सेंटरचे खेळाडू अव्वल स्थानावर विराजमान आहेत.
मुलांच्या अंतिम फेरीत अथर्वने यजमान मुंबईच्या निशांत देऊळकरवर 2-1 ने विजय मिळवला. पहिला सेट अथर्वने 5-3 ने आपल्या नावे केला. त्याला दुसर्‍या सेटमध्ये निशांतने 2-4 ने पराभूत करत बरोबरी साधली. अखेरच्या निर्णायक सेटमध्ये अथर्वने आक्रमक सर्व्हिसच्या बळावर 4-0 ने एकतर्फी बाजी मारली.
मुलींमध्ये आर्यंका काडेने पुण्याच्या परी सिंगला 2-0 ने हरवले. पहिल्या सेटमध्ये आर्यंकाने वेगवान व चपळ खेळाच्या बळावर 4-2 ने बाजी मारली. दुसर्‍या सेटमध्येदेखील परीला संधी न देता 5-3 ने विजय मिळवत किताब आपल्या नावे केला. त्यांना अर्शद देसाई, गजेंद्र भोसले, प्रवीण गायसमुद्रे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.