आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : ही आहे डॅनियला, राजस्थान रॉयल्सच्या नव्या कर्णधाराचा जडलाय जीव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयपीएल-8 चे सामने सुरू असतानाच मध्येच राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्टिव्हन स्मिथवर टाकण्यात आली आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात शेन वॉटसनच्या विरोधात झालेल्या सामन्यात वॉचसनच्या उपस्थितीतही कर्णधारपद भूषवले होते. विश्वचषकापूर्वी मायकल क्लार्क जखमी असतानाही स्मिथला ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्याने जोरदार कामगिरी करत टीम मॅनेजमेंटचा निर्णय योग्यही ठरवला. आयपीएलमध्ये मात्र त्याला कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात पराभव सोसावा लागला होता. इतरांप्रमाणेच स्टिव्हच्या यशामागे एक महिला आहे. ती म्हणजे त्याची गर्लफ्रेंड डॅनियला विल्स. डॅनियला सध्या भारतात राजस्थानच्या प्रत्येक सामन्यात आढळते.

विल्स भेटली आणि यश मिळाले
विल्स आणि स्मिथ 2012 पासून रिलेशनशिपमध्ये आहे. ते दोघे बेंगळुरूच्या एअरपोर्टवर आढळले होते. त्यावेळी स्मिथ भारतात आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी आला होता. स्टिव्हन स्मिथच्या जीवनात विल्स आली तेव्हापासून यश मिळण्यास सुरुवात झाल्याचे तो सांगतो. दोघांचे एकमेकांवर अपार प्रेम असल्याचे विल्सने सांगितले आहे.

कौण आहे डॅनी?
डॅनी सिडनीला राहते. तिने कॉमर्समध्ये शिक्षण घेतल्यानंतर मॉक्योरी युनिव्हर्सिटीमधून वकिलीचे शिक्षण घेतले. त्याचबरोबर ती इंटरनॅशनल टुर्नामेंट्समध्ये ऑस्ट्रेलियातर्फे वॉटरपोलोही खेळते.

पुढील स्लाइड्वर पाहा, स्मिथ आणि डॅनियलाचे निवडक फोटो...