आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Steven Smith Hits Maiden ODI Century To Beat Pakistan

कांगारुंसमोर गारद झाला पा‍किस्‍तान संघ, 36.3 षटकात झाला सर्वबाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - शाहिद आफ्रिदीची किेकेट मिळविल्‍यानंतर ऑस्ट्रेलियाचा सीन एबॉट)
शारजाह - स्टीवन स्मिथच्‍या शानदार शतकी (101) आणि सलामीवीर फलंदाज डेव्हिड वार्नर (43) च्‍या अर्धशतकीय भागीदारीने ऑस्‍ट्रेलियाने पहिल्‍या एकदिवसीय सामन्‍यामध्‍ये पाकिस्‍तानवर 93 धावांनी दणदणीत विजय मिळविला. पाकिस्‍तानचा ऑस्‍ट्रेलियाविरुध्‍दचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा पराभव आहे.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 8/255 एवढ्या सन्‍माजनक धावा केल्‍या. प्रत्‍युत्‍तरादाखल पा‍किस्‍तान संघ 36.3 षटकात 162 धावा करुन सर्वबाद झाला. मिशेल जॉन्सनने 24 धावा देताना तीन फलंदाजांना बाद केले. तर नाथन लियॉन आणि ग्लेन मॅक्सवेल यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्‍या. केन रिचर्ड्सन आणि सीन एबॉटला यांनी 1-1 विकेट घेतली.
पाकिस्तानकडून फक्‍त फवाद आलमने थोडा संघर्ष केला. त्‍याने खणखणीत 6 चौकार ठोकत 57 चेंडूमध्‍ये 46 धावा केल्‍या. सलामीवीर सरफराज अहमद 34 धावाची खेळी साकारली. परंतु 256 धावांचे लक्ष ते गाठू शकले नाहीत.
पुढील स्‍लाइडवर वाचा, चार वर्षांनंतर हरला पाकिस्‍तान