आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मी अद्याप पूर्णपणे फिट नाही : राफेल नदाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीना डेरमार- गुडघ्याची दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झाली नाही. फिट होण्यासाठी अजून काही वेळ लागेल, असे स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालने सांगितले. त्याने सात महिन्यानंतर पुनरागमन करत चिली ओपन टेनिस स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले.

‘अजूनही गुडघ्याचा त्रास होतो. सर्व संकटाचा धाडसाने सामना करायला हवा. कोर्टवर खेळू शकेल, हे मला आठवडाभरापूर्वी वाटले नव्हते. एका निश्चित स्तरापर्यंत मी खेळू शकतो, हे लक्षात आले. हा आठवडा माझ्यासाठी सकारात्मक राहिला. शारीरिकदृष्ट्या फिट होण्यासाठी मी मेहनत घेणार आहे, असेही तो म्हणाला.