आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्यातील फलंदाज अजून संपलेला नाही- पोलार्ड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- आयपीएलमध्‍ये चेन्‍नई सुपरकिंग्‍जवर मुंबई इंडियन्‍सने 9 धावांनी मिळवलेल्‍या विजयाचा हिरो किरॉन पोलार्डने आपल्‍यातला फलंदाज अजून संपलेला नसल्‍याचे म्‍हटले आहे.

अवघ्‍या 38 चेंडूत नाबाद 57 धावांची खेळी करणा-या पोलार्डने संघाच्‍या गरजेनुसार आपण खेळण्‍याचा प्रयत्‍न करतो, असे म्‍हटले. तो म्‍हणाला,' मला क्रिकेटच्‍या प्रत्‍येक विभागात योगदान द्यायचे आहे. मी शेवटच्‍या षटकात जो झेल टिपला, तो जर मी सोडला असता तर आम्‍ही सामना गमावला असता.'

मुंबईचा कर्णधार रिकी पॉटिंगने पोलार्ड आणि हरभजनच्‍या गोलंदाजीचे कौतुक केले. ' गेले दोन सामने खूपच चुरशीचे झाले. पोलार्ड आणि हरभजनच्‍या भागीदारीने आम्‍हाला आव्‍हानात्‍मक धावसंख्‍या उभारता आली. येथील आऊटफील्‍ड इतर भारतीय मैदानापेक्षा मोठी आहे. आमच्‍या गोलंदाजांनी विशेषत: फिरकीपटूंनी चांगली कामगिरी केली, असे पॉटिंग म्‍हणाला.