आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनने आपल्या सर्वात मोठ्या फॅनसह पाहिली मूव्ही, शेयर केले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुधीरकुमार गौतमने स्क्रीनिंगदरम्यानचा सचिनसोबतचा शेयर केलेला फोटो.... - Divya Marathi
सुधीरकुमार गौतमने स्क्रीनिंगदरम्यानचा सचिनसोबतचा शेयर केलेला फोटो....
स्पोर्ट्स डेस्क- सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा फॅन सुधीर कुमार गौतमने बुधवारी सचिनसमवेत फिल्म 'सचिनः अ बिलियन ड्रीम्स' पाहिली. यानंतर त्याने सोशल मीडियात काही फोटोज शेयर केले ज्यात तो सचिनसमवेत दिसत आहे. सुधीर हा बिहारमधील मुजफ्फरपुर येथील आहे. सचिनच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी सचिनने त्याला निमंत्रण दिले होते. यासाठी तो बुधवारी सकाळीच रेल्वेने मुंबईत दाखल झाला होता. यानंतर तो थेट फिल्मच्या स्पेशल स्क्रीनिंग येथे पोहचला. मॅचच्या अंदाजात हातात तिरंगा घेऊन पोहचला सुधीर...
 
सुधीर फिल्मच्या स्क्रीनिंग दरम्यान आपल्या नेहमीच्या अंदाजात पोहचला होता. टीम इंडियाच्या प्रॅक्टिस ड्रेसमध्ये सुधीर एका हातात तिरंगा तर दुस-या हातात शंख घेऊन आला होता. या दरम्यान त्याने पडद्यासमोर उभे राहत तिरंगा फडकावला व शंखनाद केला. आपल्या माहितीसाठी हे की, एक जूनपासून इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्राफीसाटी बुधवारी रात्रीच टीम इंडिया रवाना झाली. त्यांच्यासमवेत सुधीर रवाना झाला. 
 
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर बनलेल्या बायोपिक फिल्म 'सचिनः अ बिलियन ड्रीम्स' 26 मे रोजी रिलीज होत आहे. फिल्म रिलीज होण्याच्या दोन दिवस आधी सचिनने मुंबईत टीम इंडियातील खेळाडूंसाठी या फिल्मचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवले. ज्याला कर्णधार विराट कोहली सह टीम इंडियातील सर्व खेळाडू पोहचले. यावेळी विराट गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासह दिसला. तर, शिखर धवन मुलगा जोरावरसह फिल्म पाहायला पोहचला होता. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, स्क्रिनिंग दरम्यानचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...