आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sukesh Sonone Article About Indigenous Coach, Divya Marathi

दिव्य मराठी विशेष: क्रिकेटमध्‍ये वाढतेय \'स्‍वदेशी\' प्रशिक्षकांची मागणी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - संजय बांगर)
क्रिकेट हा तसा परकीय खेळ. पण आज भारतात क्रिकेटचा विस्‍तार एवढा झाला की, गल्‍ली-बोळात, द-या खो-यातसुध्‍दा क्रिकेट खेळले जाते. जणू काही क्रिकेट हा भारताचा राष्‍ट्रीय खेळ होऊन बसला आहे. क्रिकेट एवढे भारतीयांच्‍या रक्‍तात भिनले आहे. आंतराष्‍ट्रीय सामन्‍यांपासून ते अगदी स्‍थानिक पातळीवरील खेळांमध्‍ये क्रिकेटचाच बोलबाला आहे. जिंकण्‍यासाठी खेळाडूंना प्रशिक्षण आवश्‍यक असते. सोबत त्‍यांच्‍याकडून मेहनत करुन घ्‍यायला, त्‍यांना टीप्‍स द्यायला कुणी तरी अनुभवी व्‍यक्‍ती हवी असते. मग सुरु होते प्रशिक्षकांची मागणी. कारण आपल्‍याकडे तसे ठरलेलेच आहे की, गुरुंशिवाय ज्ञानप्राप्‍ती होत नाही!
मग गुरु शोधण्‍यासाठी धावाधाव सुरु होते. ज्‍याच्‍याकडे आधुनिक तंत्रज्ञान, ज्‍याचा नावाचा जास्‍त गवगवा, ज्‍याचे शिष्‍य फार दिग्‍गज आहेत, अशा गुरुंकडे शिष्‍याची री लागते. त्‍यातल्‍या त्‍यात गुरु जर परकीय असेल तर तो उत्‍तम असतो, असा आपला समज. पण ही समजच चुकीची आहे. ग्रेग चॅपेल या प्रशिक्षकाने भारताच्‍या संघाचे प्रशिक्षपद स्विकारले आणि भारतीय संघात वादाला ठिणगी पाडली. होती नव्‍हती संघाची अब्रु चव्‍हाट्यावर मांडली.
त्‍याला काही अपवादही असतात जसे की, दक्षिण आफ्रिकेचे गॅरी कस्‍टर्न. एक कर्तव्‍यनिष्‍ट आणि प्रामाणिक प्रशिक्षक म्‍हणून यांची ख्‍याती आहे. त्‍यांच्‍या मार्गदर्शनाखालीच भारतीय संघाने 2011 चा विश्‍वचषक जिंकला. आपले कर्तव्‍य बजावल्‍यावर गॅरी कर्स्‍टन आपल्‍या मायदेशी परतले.

गॅरी कस्‍टर्ननंतर 65 वर्षीय फ्लेचर यांची 27 एप्रिल 2011 मध्‍ये भारतीय संघाच्‍या मुख्‍य प्रशिक्षकपदी नियुक्‍ती करण्‍यात आली होती. भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कस्‍टर्नच्‍या शिफारशीमुळे त्‍यांची नियुक्‍ती करण्‍यात आली होती. पण ते सपशेल अपयशी ठरले. आणि पुन्‍हा एकदा 'स्‍वदेशी' प्रशिक्षकच किती महत्‍वाचा ठरु शकतो हे आयपीएलमध्‍ये किंग्‍ज इलेव्‍हन पंजाबच्‍या कामगिरीवरुन ठरले.
आयपीएलच्‍या सर्वच संघांना विदेशी प्रशिक्षक होते. परंतु एकाही संघाची कामगिरी त्‍यांच्‍या लौकिकाला साजेशी नव्‍हती. परंतु आयपीएलमध्‍ये एकमेव भारतीय प्रशिक्षक म्‍हणून संजय बांगर होते. आणि त्‍यांच्‍याच मार्गदर्शनाखाली आयपीएलमधील रसातळाला असलेल्‍या किंग्‍ज इलेव्‍हन पंजाब संघ अंतीम फेरीपर्यंत मजल मारु शकला होता. त्‍यांच्‍यामुळेच फ्लेचरच्‍या जागी संजय बांगरची वर्णी लागण्‍याची शक्‍यता आहे. तसेच भारताचा 'द वॉल' राहुल द्रविड, अनिल कुंबळे, राहुल द्रविड आणि स्टीफन फ्लेमिंग यांची नावे प्रशिक्षकांच्‍या शर्यतीत आहेत.

आज घडीला आपल्‍या लक्षात येईल की, ज्‍या देशांचे प्रशिक्षक हे त्‍याच देशाचे आहेत. तेच देश यशस्‍वी होत आहेत. दक्षिण आफ्रिका, ऑस्‍ट्रेलियासारख्‍या मातब्‍बर देशांनी सुध्‍दा आपल्‍या मायदेशातील प्रशिक्षक नेमले आहेत. आणि त्‍यांच्‍या अखत्‍यारीत हे संघ चांगली वाटचाल करीत आहेत.
पुढील स्‍लाइडवर वाचा, दक्षिण आफ्रिकेच्‍या प्रशिक्षकांविषयी