आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sultan Azlan Shah Cup: Sardar Charged Up To Face Australia

सरदारच्या नेतृत्वात अझलनशाह कप हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघ रवाना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - स्टार मिडफील्डर सरदारसिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चालू वर्षीच्या पहिल्या मोठ्या सुलतान अझलनशाह कप हॉकी स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे.
श्रीजेशकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. येत्या ५ ते १२ एप्रिलदरम्यान आयोजित स्पर्धेत भारतासह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, कॅनडा आणि यजमान मलेशिया हे सहा संघ सहभागी होत आहेत. आशियाई स्पर्धेतील सुवर्ण विजेत्या भारतीय संघाने या स्पर्धेसाठी मेजर ध्यानंचद राष्ट्रीय स्टेडियममध्ये जोरदार सराव केला.
संघाचा कर्णधार सरदारसिंग, गोलरक्षक पी. आर. श्रीजेश आणि संघाचे नवीन प्रशिक्षक हॉलंडचे पॉल वान एस यांची पहिली स्पर्धा आहे. सरदाराच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०१४ मध्ये १६ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकूण रिओ ऑलिम्पिकसाठी थेट पात्रता मिळवली. त्याचबरोबर भारताने चॅम्पियन ट्रॉफीमध्ये १८ वर्षांनंतर हॉलंडला पराभूत केले आणि विश्व चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज दिली. ही स्पर्धाही जिंकू, असे सरदार म्हणाला.