नवी दिल्ली - येत्या १२ ऑक्टोबरपासून चौथ्या सुलतान जोहर चषक हॉकी स्पर्धेला सुरुवात होत आहे. हरजितसिंगकडे या स्पर्धेत सहभागी होणा-या भारताच्या ज्युनियर संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. सोमवारी भारताचा १८ सदस्यीय हॉकी संघ जाहीर करण्यात आला. ही हॉकी स्पर्धा १२ ते १९ ऑक्टोबरदरम्यान मलेशियातील बहारू येथे रंगणार आहे. भारताचा संघ ९ ऑक्टोबरला मलेशियाला रवाना होईल.
गत चॅम्पियन भारतीय संघ यंदाही स्पर्धेच्या किताबावरचे
आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी इमरान खान, गुरिंदर सिंग आणि जरमनप्रीत सिंग या युवा खेळाडूंकडून माेठ्या खेळीची आशा आहे. या वेळी संघातील स्टार फाॅरवर्ड इमरान खानची उपकर्णधारपदी वर्णी लागली. हॉकी इंिडयाच्या निवड समितीचे पी. गाेविंदा, हरबिंदर सिंग, आर. पी. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली संघाची घाेषणा करण्यात आली. या स्पर्धेत भारतासह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि यजमान मलेशिया संघांचा समावेश आहे.
भारताचे स्पर्धेतील सामने
१२ ऑक्टोबर न्यूझीलंडविरुद्ध
१३ ऑक्टोबर इंग्लंडविरुद्ध
१५ ऑक्टोबर पाकिस्तानविरुद्ध
१६ ऑक्टोबर मलेशियािवरुद्ध
१८ ऑक्टोबर ऑस्ट्रेलियाविरुद्ध