आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunderland Disappointed Over Social Media's Post Over The Fawad Ahmad

क्रिकेटपटू फवाद अहमदविषयी सोशल मीडियात उमटलेल्या प्रतिक्रियांवर सुदरलँड बोलले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी - जन्माने पाकिस्तानी आणि नुकताच ऑस्ट्रेलियन नागरिकत्व स्वीकारलेला क्रिकेटपटू फवाद अहमद याच्याविषयक सोशल मीडियात उमटलेल्या वंशद्वेषी प्रतिक्रियांबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष जेम्स सुदरलॅँड यांनी संबंधितांना फटकारले. लेगस्पिनर फवाद अहमद याने व्हीबी ब्रँडच्या बिअरचा लोगो असलेला टी शर्ट परिधान करण्यास धार्मिक कारणास्तव नकार दिल्यानंतर त्याबाबत ऑस्ट्रेलियात सोशल मीडियात टीकेचा सूर उमटला आहे.


फवाद अहमद याने त्याच्या टी-ट्वेन्टी सामन्यांतील आंतररराष्‍ट्रीय प्रवेशाच्या सामन्यात संबंधित लोगो असलेल्या टी शर्टला नकार दिला होता. बोर्डाने त्याची ही विनंती मान्य करून त्याला बिअर कंपनीचा लोगो नसलेला टी शर्ट वापरण्याची मुभा दिली होती. ऑस्टेलियातील सोशल मीडियात मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निर्णयावर टीकेचे वादळ उठले.