आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunil Gavaskar Comment On IPL; Sports News In Marathi

यंदाच्या आयपीएलमध्ये बुकींचा खेळाडूंशी संपर्क; सुनील गावसकरांचा गौप्यस्फोट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये सट्टेबाजांनी दोन खेळाडूंशी संपर्क साधला होता. बीसीसीआय व आयपीएलचे हंगामी अध्यक्ष सुनील गावसकर यांनी गुरुवारी हा गौप्यस्फोट केला. याची माहिती भ्रष्टाचारविरोधी शाखेला देण्यात आली आहे.

गावसकर म्हणाले, सट्टेबाजांकडून ब्रँडन मॅक्युलमशी संपर्क साधण्याचे प्रकरण मोठे गंभीर आहे. मात्र, ही माहिती कुठून फुटली याची आपल्याला कल्पना नाही. यंदाच्या हंगामासाठी आम्ही प्रत्येक संघासोबत एक इंटिग्रिटी ऑफिसरही नियुक्त केला आहे. यामुळे खेळाडूंना आपले म्हणणे मांडण्यात अडचण येत नसल्याचे गावसकर म्हणाले.

वरिष्ठ खेळाडूंकडून सल्ला : गावसकर म्हणाले की, पद स्वीकारल्याच्या दुसर्‍याच दिवशी मी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण व अनिल कुंबळेसोबत चर्चा केली होती. या खेळाडूंना सध्याची स्थिती व दबावाची चांगली माहिती आहे. नवोदीतांना त्यांचे करिअर सावरण्याबाबात मार्गदर्शन देण्याची मोठी गरज असल्याचे त्यांनी सांगितले