आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अति आत्मविश्वासामुळे भारताचा आशिया चषकात पराभव - गावसकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध लढतीत भारतीय फलंदाज अति आत्मविश्वासाने खेळले. त्यांच्या फटक्यांची निवड चुकीची होती, असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त केले. पाकविरुद्ध पराभवानंतर निराश झालेल्या गावसकर यांनी पराभवाचे खापर फलंदाजांवर फोडले.


भारताने काही विकेट स्वत:हून गमावल्या. फलंदाजांना अधिकचा आत्मविश्वास भारताला नडला. असे असले तरीही पाकनेही चांगला खेळ केला. शेरे बांगला स्टेडियमची सीमारेषा छोटी असल्याने बहुधा आफ्रिदीला षटकार खेचण्यात यश आले, असेही गावसकर यांनी नमूद केले.


आफ्रिदी थ्री इन वन : पाकचे माजी क्रिकेटपटू अब्दुल कदीर यांनी आफ्रिदीची मुक्तकंठाने स्तुती केली.