आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunil Gavaskar News In Marathi, Indian Cricket, Divya Marathi

...तर निवृत्ती जाहीर करा, सुनील गावसकरांचा दिग्गजांना इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - इंग्लंडविरुद्ध मालिका गमावून भारतीय संघाने आपली प्रतिष्ठा वेशीवर टांगली आहे. दिग्गजांच्या लाजिरवाण्या खेळीमुळेच भारताने मालिकेत पराभव पत्करला. भारतासाठी कसोटी खेळण्यास अनुत्सुक असलेल्या या स्टार खेळाडूंनी तत्काळ निवृत्ती जाहीर करावी, अशा कडक शब्दात माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी वरिष्ठ खेळाडूंना इशारा दिला. या खेळाडूंनी केवळ वनडे फॉरमॅट खेळण्यावर अधिक भर द्यावा, असा टोलाही त्यांनी लगावला.
नुकताच इंग्लंडने पाचव्या कसोटीत भारताचा एक डाव व 244 धावांनी पराभव केला. याशिवाय यजमान संघाने 3-1 ने मालिकाही आपल्या नावे केली. भारताला सलग दुस-या कसोटीत पराभवाला सामोरे जावे लागले.