गयाना - वेस्ट इंडीजचा स्टार गोलंदाज सुनील नरेनने कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये नव्या विक्रमाची नोंद केली. या विक्रमाच्या बळावर त्याने ‘मिस्ट्री बॉलर’ अशी नवीन ओळख मिळवली आहे. त्याने गुरुवारी लीगमध्ये सुपर मेडन ओव्हर (निर्धाव षटक) टाकून विक्रम केला.
प्रथम फलंदाजी करताना ड्वेन ब्राव्होच्या नेतृत्वाखाली रेडी स्टील संघाने आठ गड्यांच्या मोबदल्यात 118 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात रामदीनच्या गुयाना वॉरियर्सने 9 गडी गमावून 118 धावांपर्यंत मजल मारून सामना टाय केला होता.
चौकार आणि षटकारांच्या आतषबाजीसाठी ओळखल्या जाणा-या टी-20 सामन्यात सुनील नरेनने रोमांचकपणाची नवी सीमारेषा निश्चित केली. त्याने कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (सीपीएल) नव्या विक्रमाची नोंद केली. या वेळी लीगमध्ये झालेल्या गुयाना अमेझोन वॉरियर्स आणि रेड स्टील यांच्यातील सामना टाय झाला होता. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये सुनील नरेनने सुपर गोलंदाजीच्या बळावर आपल्या गुयाना संघाचा विजय निश्चित करून दिला.
गयाना अमेझोन विजयी
दिनेश रामदीनच्या नेतृत्वाखाली गुयाना अमेझोन वॉरियर्स संघाने रेड स्टीलविरुद्ध रंगतदार लढतीत सुपर ओव्हरमध्ये विजयाची नोंद केली. दोन्ही संघांनी प्रत्येकी 181 धावांची खेळी केली होती. त्यामुळे टाय झालेल्या या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लावण्यात आला. यात गुयाना संघाने घरच्या मैदानावर बाजी मारली.
असा केला विक्रम
सुनील नरेनच्या सुपर ओव्हरमधील पहिल्या चार चेंडूंवर रेड स्टीलच्या फलंदाजांना एकही धाव काढता आली नाही. त्यानंतर पाचव्या चेंडूवर नरेनने निकोलसला बाद केले. त्यापाठोपाठ सहावा चेंडू डॉट टाकून सुनील नरेनने नवा इतिहास आपल्या नावे केला.