आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunil Narine Cricketer Birthday Latest News In Marathi

B\'DAY SPCL: टॅक्‍सी ड्रायव्‍हरचा मुलगा आहे सुनील नरेन, आज नाइटरायर्डसला नेले वेगळया उंचीवर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयपीएलच्‍या सातव्‍या पर्वामध्‍ये कोलकात्‍याला पुन्‍हा एकदा प्‍लेऑफ पर्यंत नेण्‍याचे काम एका टॅक्‍सी ड्रायव्‍हरच्‍या मुलाने केले आहे. हा मुलगा आहे सुनील नरेन. 26 मे रोजी सुनील आपला 26 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2012 मध्‍ये झालेल्‍या आयपीएलमध्‍ये सुनीलच्‍या अप्रतिम गोलंदाजीमुळे केकेआर चॅम्पियन ठरले होते. तर 2014 मध्‍ये सर्वाधीक विकेट मिळविणारा गोलंदाज म्‍हणून तोच ठरला आहे.
सुनील नरेनचे वडील क्रिकेटचे फार मोठे चाहते होते. सुनील गावस्‍करच्‍या नावावरुन त्‍यानी त्‍यांच्‍या मुलाचे नाव सुनील ठेवले.
टॅक्‍सी ड्रायव्‍हरचा मुलगा आहे सुनील
सुनीलचे वडील आपल्‍या परिवाराचे पोट भरण्‍यासाठी काही छोटेमोठे काम करत असत. नंतर त्‍यानी टॅकसी चालविण्‍याचे तसेच सफाई कर्मचारी म्‍हणूनही काम केले आहे. एवढया गरीबीचा सामना करुन त्‍यांनी सुनीलला आंतराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये पोहोचवले.

आयपीएलमुळे सुनील झटपट श्रीमंत झाला खरा तरीही आज त्‍याचे आई-वडील जुन्‍या घरामध्‍येच राहतात.
सुनीलने आपल्‍या क्रिकेटकरिअरची सुरुवात फलंदाज म्‍हणून केली होती. त्‍यानंतर तो वेगवाग गोलंदाजीकडे वळला. परंतु वारंवार पाठीचे त्रास उद्भवल्‍याने तो हळूहळू फिरकी गोलंदाजीकडे वळला. फलंदाजीसाठी त्‍याने पेन, टुथब्रश सुध्‍दा सोडले नाही, असे सुनीलच्‍या आईने सांगितले.
सुनील नरेनने गेल्‍यावर्षी नोव्‍हेंबरमध्‍ये गर्लफ्रेंड नंदितीसोबत लग्‍न केले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, सुनील नरेनची काही खासगी छायाचित्रे...