आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL : सनी लिओनने केले प्रितीच्या टीमला Cheer, भांगडा करण्याची संधी मात्र हुकली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहाली - किंग्ज इलेव्हन पंजाबला चिअर करण्यासाठी पोहोचलेली सनी लिओन रविवारी निराश झाली. बॉलीवूड स्टार प्रिती झिंटाची टीम मुंबई इंडियन्सकडून 22 धावांनी पराभूत झाल्याने तिची निराशा झाली. मुंबईने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 172 धावा केल्या होत्या. सामन्यादरम्यान अँकर अर्चना विजय हिच्याबरोबर बोलताना सनीने प्रितीच्या किंग्स इलेवन पंजाबला सपोर्ट करण्यासाठी आले असल्याचे सांगितले यावेळी तिचा पती डॅनियलही तिच्याबरोबर होता. टीम आणि मी दोघेही पंजाबी आहोत, त्यामुळे टीम जिंकली तर भांगडा करेल असेही सनी यावेळी म्हणाली. पण तीची संधी हुकली. पंजाबचा पराभव झाल्याने तिला भांगडा करता आला नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा, पंजाबला चिअर करण्यासाठी पोहोचलेल्या सनीचे Photo