आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunrisers Hyderabad On Winning Track Again In IPL

हैदराबाद विजयी ट्रॅकवर, ८ गड्यांनी बंगळुरूवर मात; वॉर्नर, धवनची अर्धशतके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - सामनावीर डेव्हिड वॉर्नर (५७) अाणि शिखर धवनच्या (नाबाद ५०) झंझावाती फलंदाजीच्या बळावर सोमवारी सनरायझर्स हैदराबाद टीमने आठव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० स्पर्धेत शानदार विजयाची नोंद केली. हैदराबाद टीमने सामन्यात यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर ८ गड्यांनी मात केली. यासह हैदराबाद टीम स्पर्धेत विजयी ट्रॅकवर आली आहे. या टीमचा हा स्पर्धेतील पहिला विजय ठरला. यापूर्वी हैदराबादला अापल्या सलामी सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते.

प्रथम फलंदाजी करताना यजमान बंगळुरू टीमने १९.५ षटकांत १६६ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात पाहुण्या हैदराबादच्या टीमने १७.२ षटकांत २ गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. धावांचा पाठलाग करणाऱ्या हैदराबादला डेव्हिड वॉर्नर अाणि शिखर धवन यांनी दमदार सुरुवात करून दिली. या जाेडीने टीमला ८२ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. संघाच्या विजयाचा मजबूत पाया रचला. त्यानंतर धवनने लाेकेश राहुलसाेबत (नाबाद ४४) ७८ धावांची अभेद्य भागीदारी करून टीमला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून हैदराबाद टीमने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगळुरूला गेल- विराटने दमदार सुरुवात करून दिली. या दाेघांनी पहिल्या विकेटसाठी ३३ चेंडूंचा सामना करताना ४३ धावांची भागीदारी केली. मात्र, गेलला समाधानकारक खेळी करता अाली नाही. त्याने २१ धावांची खेळी करून तंबू गाठला. काेहलीने ४१ धावांची खेळी केली. दिनेश कार्तिक सलग दुसऱ्या डावात फ्लाॅप ठरला. त्याला ९ धावांची खेळी करता अाली. यापूर्वी काेलकाताविरुद्ध कार्तिकने ६ धावा काढल्या हाेत्या. डिव्हिलर्सने २८ चेंडूत ४६ धावा काढल्या. यात ५ चाैकार व दाेन षटकारांचाही समावेश अाहे.

धवन, वाॅर्नरची अर्धशतके
सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर शिखर धवनने यजमान बंगळुरूविरुद्ध झंझावाती फलंदाजी केली. त्याने नाबाद अर्धशतक झळकावले. धवनने ४२ चेंडूंत चार चाैकार व दाेन षटकारांसह नाबाद ५० धावा काढल्या. डेव्हिड वाॅर्नरने शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याने २७ चेंडूंचा सामना करताना धडाकेबाज ५७ धावा काढल्या. यात सहा चाैकार अाणि चार षटकारांचा समावेश अाहे.

गेलचे २०० षटकार
राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमचा गेलने साेमवारी अायपीएल स्पर्धेत २०० षटकार पूर्ण केले. अायपीएलमध्ये हा अाकडा पार करणारा गेल हा पहिला क्रिकेटपटू ठरला अाहे. त्याने बंगळुरूचे प्रतिनिधित्व करताना हैदराबादविरुद्ध एक षटकार ठाेकला. यासह त्याने २०० च्या अाकड्याला गवसणी घातली. गेलने ७० सामन्यांतून हा विक्रम अापल्या नावे केला.
पुढील स्लाइड्सवर पाहा पॉइंट्स टेबल आणि स्कोअर कार्ड...