हैदराबाद - सनरायझर्स हैदराबादने शनिवारी अाठव्या सत्राच्या अायपीएलमध्ये विजयाचा चाैकार मारला. यजमान टीमने धाेनीच्या चेन्नई सुपरकिंग्जवर २० धावांनी मात केली.
डेव्हिड वाॅर्नर (६१) अाणि धवनच्या (३७) यांच्या फलंदाजीच्या बळावर हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १९२ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात हेनरिक्स अाणि भुवनेश्वर कुमारने धारदार गाेलंदाजीच्या बळावर चेन्नई टीमचा १७० धावांत खुर्दा उडवला. चेन्नईकडून डुप्लेसिसने सर्वाधिक ३३ धावा काढल्या. धाेनी २० धावा काढून बाद झाला. रैनाने २३ व मॅक्लुमने १२ धावांची खेळी केली.
हैदराबाद संघाकडून डेव्हिड वाॅर्नर अाणि शिखर धवनने दमदार सुरुवात केली. सलामीच्या या जाेडीने पहिल्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली. धवनने ३२ चेंडूंत चार चाैकारांच्या अाधारे ३७ धावांची खेळी केली. त्यानंतर नमन अाेझा २०, हेनरिक्स १९ अाणि माेर्गनने नाबाद ३२ धावांचे याेगदान दिले.
वाॅर्नरचा झंझावात
हैदराबाद संघाच्या डेव्हिड वाॅर्नरने झंझावाती फलंदाजी केली. त्याने २८ चेंडूंत ६१ धावा काढल्या. यात ११ चाैकार अाणि एका षटकाराचा समावेश अाहे. त्याने चार चौकार अाणि षटकारांच्या अातषबाजीतून ५० धावा काढल्या.
हेनरिक्सने घेतले २ बळी
हैदराबादकडून हेनरिक्स अाणि भुवनेश्वर कुमारने धारदार गाेलंदाजी केली. या दाेघांनी प्रत्येकी दाेन विकेट घेतल्या. हेनरिक्सने स्मिथ व सुरेश रैनाला बाद केले. अाशिष रेड्डीने धाेनीची विकेट काढली. भुवनने मॅक्लुम व नेगीला तंबुत पाठवले.
धावफलक
सनरायर्झस हैदराबाद धावा चेंडू ४ ६
वॉर्नर झे. स्मिथ गो. रैना ६१ २८ ११ १
शिखर धवन धावबाद ३७ ३२ ४ ०
हेनरिक्स यष्टी. धोनी गो. नेगी १९ ०९ १ २
इयान मॉर्गेन नाबाद ३२ २७ १ २
नमन ओझा त्रि. गो. नेहरा २० १२ ३ १
रेड्डी झे. धोनी गो. ब्राव्हो ०६ ०६ १ ०
विहारी झे. सब अपराजित गो. ब्राव्हो ०८ ०५ १ ०
कर्ण शर्मा झे. जडेजा गो. ब्राव्हो ०४ ०२ १ ०
अवांतर : ५. एकूण : २० षटकांत ७ बाद १९२ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-८६, २-१०७, ३-१३१, ४-१५६, ५-१६३, ६-१८८, ७-१९२. गोलंदाजी : मोहित शर्मा ४-०-५८-०, नेहरा ४-०-३१-१, रोहित मोरे २-०-२८-०, रैना ४-०-२९-१, ब्राव्हो ४-०-२५-३, पवन नेगी २-०-२०-१.
चेन्नई सुपर किंग्ज धावा चेंडू ४ ६
स्मिथ झे. विहारी गो. हेनरिक्स २१ १९ ३ १
ब्रेंडन मॅक्लुम त्रि.गो. भुवनेश्वर १२ ५ ३ ०
सुरेश रैना झे. मॉर्गन गो. हेनरिक्स २३ १५ ० ३
डुप्लेसिस धावबाद (आिशष रेड्डी) ३३ २२ ४ ०
धोनी त्रि. गो. आशिष रेड्डी २० १६ २ ०
पवन नेगी त्रि.गो. भुवनेश्वर १५ ११ १ १
डॅवेन ब्राव्हो नाबाद २५ २० ३ ०
रवींद्र जडेजा नाबाद १४ १२ ० ०
अवांतर : ७, एकूण : २० षटकांत ६ बाद १७० धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-१४, २-४८, ३-६८, ४-११४, ५-११४, ६-१४१. गोलंदाजी : बोल्ट ४-०-४४-०, भुवनेश्वर ४-१-३२-२, प्रवीण कुमार ४-०-३३-०, हेनरिक्स ४-०-२०-२, कर्ण शर्मा २-०-१९-०, रेड्डी २-०-१९-१.