आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunrisers To Bat First Against Kings Eleven Punjab

IPL: हैदराबादचा आठवावा प्रताप; किंग्ज इलेव्हनवर 30 धावांनी मात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहाली- आयपीएल-6 मध्ये सनरायझर्स हैदराबादने शनिवारी यजमान किंग्ज इलेव्हन पंजाबला 30 धावांनी पराभूत केले. हैदराबादचा हा आठवा विजय तर पंजाबचा आठवा पराभव ठरला. पार्थिव पटेलच्या (61) अर्धशतकानंतर डॅरेन सॅमी (4 विकेट) आणि डेल स्टेन (2 विकेट) यांनी घातक गोलंदाजी करून हैदराबादला विजय मिळवून दिला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 150 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाबला 9 बाद 120 धावाच काढता आल्या.
किंग्ज पंजाबकडून धावांचा पाठलाग करताना पोमर्शबॅच (33), आर. सतीश (25), गिलख्रिस्ट (26) यांनी बºयापैकी झुंज दिली. मात्र, इतर फलंदाजांचे अपयश पंजाबला भोवले. डेव्हिड मिलर (6), मनदीपसिंग (0), शॉन मार्श (18) हे खेळाडू अपयशी ठरले. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून कर्णधार अ‍ॅडम गिलख्रिस्टने सनरायझर्स हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. अवघ्या 52 धावांत हैदराबादचा निम्मा संघ बाद करून गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. मात्र, पार्थिव पटेलने 47 चेंडूत 61 आणि तळातल्या टी.परेराने 19 चेंडूत 32 धावा काढून हैदराबादला 150 धावांचा स्कोअर उभा करून दिला. पंजाबचा युवा खेळाडू 19 वर्षीय संदीप शर्माने शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत 21 धावा देऊन तीन बळी घेतले. त्याने हनुमा विहारी (5), कर्णधार कॅमरून व्हाइट (10) आणि सामंत्रे (9) यांना बाद केले.
मोहालीचा मोर्चा आता धर्मशाळेकडे आयपीएल-6चा मोहालीतील हा शेवटचा सामना होता. यामुळे स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात चाहत्यांची गर्दी होती. या ठिकाणी दोन सामने खेळवले जातील.

संक्षिप्त धावफलक
हैदराबाद : 7 बाद 150 वि.वि. पंजाब : 9 बाद 120