आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Superstar Shah Rukh Khan Unveiled Sania Mirza\'s Autobiography \'Ace Against Odds\'

PHOTOS:सानियाने शाहरुखला आपल्या हाताने भरवला केक, असा झाला समारंभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपले आत्मचरित्र \'Ace Against Odds\' या पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर सानियाने शाहरूखला केक भरवला. - Divya Marathi
आपले आत्मचरित्र \'Ace Against Odds\' या पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर सानियाने शाहरूखला केक भरवला.
हैदराबाद- बॉलिवुड सुपरस्टार शाहरुख खानने बुधवारी टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या ऑटोबायोग्राफी 'एस अगेंस्ट ऑड्स' चे प्रकाशन केले. या पुस्तकात सानियाच्या आयुष्याशी संबंधित सर्व महत्त्वाच्या घटना, संघर्ष आणि यश याचा उल्लेख केला आहे. पुस्तक प्रकाशनानंतर एक क्षण असाही आला जेव्हा सानियाने शाहरुख खानला आपल्या हाताने केक भरवला. सानियाला म्हटले रॅकेटची राणी...
- सानियाच्या ऑटोबायोग्राफी लॉन्च करण्यास बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान हैदराबादमध्ये पोहचला.
- शाहरुख खान येताच सानिया खूप खूष दिसली. सानियाने शाहरूखसोबत नुसते फोटोज काढले नाहीत तर आपल्या हाताने बॉलिवूडचा किंग ऑफ रोमान्सला केक भरवला.
- या इव्हेंटमध्ये शाहरुख खानने सानियाने 'राणी ऑफ रॅकेट' म्हटले. सानियाने भारताने नाव जगात चमकवले असेही किंग खान म्हणाला.
- शाहरुख म्हणाला, आम्ही पीटी उषा, मेरी कॉम आणि सानिया मिर्झा यासारख्या लोकांना सलाम करतो कारण त्यातील त्यांनी देशातील तरुणांना खेळाकडे वळविले.
ट्विटरवर अशी झाली चेष्टा-मस्करी
- या इव्हेंटनंतर शाहरुख आणि सानिया यांच्यात ट्विटरवर चेष्टा-मस्करी झाली.
- हा समारंभ संपल्यानंतर सानियाने शाहरुखला धन्यवाद म्हटले.
- त्यावर शाहरूख म्हणाला, तुझ्यासारख्या खेळाडूच्या पुस्तक प्रकाशनाला मला बोलावले हेच मी माझा सन्मान समजतो.
- तसेच किंग खानने तुझ्या हाताने मला पकोडे आणि समोसा खायला घातला त्याबद्दल सानियाचे आभार मानले. खूप दिवसानी असे पदार्थ खाल्याचे त्याने सांगितले.
- असे वृत्त आहे की, मुंबईत सानियाच्या पुस्तकाचे प्रकाशन सलमान खान करेल.
पुस्तक लिहायला पाच वर्षे लागली-
- सानियाचे आत्मचरित्र लिहायला तिला पाच वर्षे लागली असे सानियाचे वडील इम्रान मिर्झा यांनी सांगितले.
- या पुस्तकात सानियाशी संबंधित सर्व माहिती दिली आहे. तिच्यासोबत झालेले वाद सुद्धा यात आहेत त्यांनी सांगितले.
- 40 प्रकरणात लिहलेल्या या पुस्तकात सानिया 4-5 वर्षाची असतानापासूनचे घटना दिल्या गेल्या आहेत.
- आपल्या 'Ace Against Odds' या पुस्तकाबाबत सानियाने यावेळी भाष्य केले.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, कसा राहिला सानियाच्या पुस्तक समारंभाचा सोहळा....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...