आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court Named People Involved In Cricket IPL Spot Fixing

IPL FIXING: सुप्रीम कोर्टाने घेतली श्रीनिवासन, राज कुंद्रा यांच्यासोबत तीन खेळाडूंची नावे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल फोटो- चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्यासोबत गुरुनाथ मयप्पन.)

नवी दिल्ली- न्यायाधिश टी. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील सुप्रीम कोर्टाच्या खंडपिठाने मुदगल समितीचा रिपोर्ट सार्वजनिक केला आहे. यात आयसीसी प्रमुख एन. श्रीनिवासन, त्यांचा जावाई गुरुनाथ मयप्पन, राजस्थान रॉयल्सचे सहमालक राज कुंद्रा, आयपीएलचे सीओओ सुंदर रमन यांच्यासह तीन क्रिकेटर्सचा उल्लेख आहे. कोर्टाने आधी क्रिकेटर्सचे नाव जाहीर केले होते. पण त्यानंतर ही नावे सार्वजनिक न करण्याचे आदेश दिले. कोर्टाने हेही म्हटले आहे, की बीसीसीआयच्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुका रद्द करण्यात याव्यात.
मुदगल समितीच्या रिपोर्टमधील सात जणांच्या नावांचा उल्लेख करताना सुप्रीम कोर्टाने सांगितले, की या लोकांना गिल्टी ऑफ मिसडेमर म्हटले जाऊ शकते. याचाच दुसरा अर्थ असा, की या लोकांना कमी गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यातील दोषी असे म्हटले जाऊ शकते. सुप्रीम कोर्टाने जाहीर केलेल्या नावांमध्ये चौघे खेळाडू नाहीत. चार दिवसांच्या आत ते निर्णयावर आक्षेप घेऊ शकतात.
यादरम्यान, न्यायाधिश मुदगल यांनी म्हटले आहे, की सुप्रीम कोर्टात रिपोर्ट दाखल करताना त्यांच्यावर किंवा त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीवर कोणत्याही स्वरुपाचा दबाव नव्हता.
आयपीएलमधील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करीत असलेल्या मुदगल समितीने चालू वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात सांगितले होते, की श्रीनिवास यांचा जावाई गुरुनाथ मयप्पन चेन्नई सुपर किंग्ज टीमचा चेहरा आणि टीम अधिकारी होता. त्याच्याविरुद्ध सट्टेबाजी आणि सामन्याशी निगडित सुचना देण्याचा आरोप सिद्ध झाला आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, कोणत्या कारणांमुळे मयप्पन आणि राज कुंद्रा सापडले संकटात... समितीच्या अहवालात आले नाव...