आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court Proposes N Srinivasan Removal, Suggests Sunil Gavaskar As BCCI President

श्रीनिवासन यांनी पद सोडावे, बीसीसीआय गावसकरांच्या हाती सोपवा -न्यायालय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन अध्यक्षपद सोडायला तयार नसले तरी सुप्रीम कोर्टाने गुरुवारी कठोर होत त्यांना हे पद सोडावेच लागेल, असे बजावले. शिवाय, ही जबाबदारी सुनील गावसकर यांना सोपवावी, असा प्रस्तावही दिला.

बोर्डाला शुक्रवारी सकाळपर्यंतची मुदत असून साडेदहा वाजता सुनावणीत बोर्डाने भूमिका मांडल्यावर सुप्रीम कोर्ट यासंबंधी हंगामी आदेश काढेल.

आदेश कोण डावलेल?
सुप्रीम कोर्टाचा आदेश कोण डावलेल? याबाबत मी आनंदी आहे. शिवाय जबाबदारी घेण्यास तयारही आहे. - सुनील गावसकर

भले उशीर झाला, तरी विजय सत्याचाच : सुप्रीम कोर्ट
कोर्टाचा प्रस्ताव : चेन्नई व राजस्थान टीमशी संबंधितांवर सट्टेबाजीचा आरोप आहे. म्हणून तपास पूर्ण होईतो दोन्ही संघांना बाहेर करावे, असा प्रस्ताव आहे.
बोर्डाचा युक्तिवाद : टीमशी करार मोडणे कठीण. आयपीएल-7चा कार्यक्रम ठरला आहे. दोन्ही संघ बाहेर झाल्यास सामन्यांचा फॉर्मेट बिघडेल.
कोर्टाचे मत, राज कुंद्रा व मयप्पन यांचे निलंबन झाले. त्यांच्याशी असे घडले, मग टीमशी का नको.

कोर्टाचा प्रस्ताव : श्रीनिवासन यांना पदावरून हटवले पाहिजे. त्यांच्या जागी सुनील गावसकरांना अध्यक्ष करावे. ते तयार आहेत काय, हे त्यांना विचारा.
बोर्डाचा युक्तिवाद : तपास पूर्ण होईतो दूर होण्यास श्रीनि तयार आहेत. तपासात ते सहकार्य करतील. पण तपास वेळेत पूर्ण व्हावा.
कोर्टाचे मत, सध्या श्रीनिंना हटवण्याचा आदेश काढत नाहीत. तपासापर्यंत गावसकरांचा प्रस्ताव.

गावसकरांसाठी बोर्ड घटना बदलणार?
चंदिगड कोर्टाच्या आदेशामुळे बोर्ड अडचणीत आहे. गावसकरांना नेमण्यासाठी बोर्डाला घटना बदलावी लागेल. गावसकरांऐवजी कोर्टाने एखाद्या अधिकार्‍याच्या नावाचा प्रस्ताव द्यावा, अशी विनंती बोर्डाचे वकील शुक्रवारी कोर्टात करू शकतात. स्वच्छ प्रतिमेचे गावसकर यांच्या नावाला कुणीही विरोध करणार नाही, हा विचार करून सुप्रीम कोर्टाने त्यांचे नाव सुचवले.

क्रिकेटच्या प्रतिष्ठेला धक्का : शरद पवार
‘न्यायालयाने जे काही म्हटले आहे, ते पाहता एकूणच माझ्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत क्रिकेटला जी प्रतिष्ठा मिळाली होती, तिला धक्का लागला आहे.’

महत्त्व ज्यांच्यावर संशय आहे त्या सर्व संबंधितांनी बोर्डावरून बाजूला व्हावे, ही सुप्रीम कोर्टाची भूमिका.
परिणाम बोर्डात खेळाडूंचे वर्चस्व वाढेल. 16 एप्रिलपासून सुरू होणारे आयपीएल-7 रद्द होऊ शकते.

संशय
समितीशी धोनी खोटे का बोलला?

सुनावणीत महेंद्रसिंह धोनीचेही नाव आले. याचिकाकर्त्यांचे वकील हरीश साळवे म्हणाले, धोनीचे तपास पथकापासून सत्य दडवून ठेवले. मयप्पन केवळ क्रिकेटचा रसिक असल्याचे सांगून चेन्नई संघाशी त्याचा संबंध नसल्याचे तो म्हणाला होता. वास्तविक मयप्पन टीम प्रिन्सिपल होता, हे तपासात निष्पन्न झाले आहे.