Home | Sports | From The Field | surech raina & purna patel together in shirdi

रैना आणि पूर्णाची जोडी आता येतेयं चर्चेत

agency | Update - Jun 02, 2011, 01:41 PM IST

वेस्टइंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी सुरेश रैनाची निवड झाल्याने त्याचे नशीब जोरावर असल्याची चर्चा आहे.

  • surech raina & purna patel together in shirdi

    मुंबई - वेस्टइंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी सुरेश रैनाची निवड झाल्याने त्याचे नशीब जोरावर असल्याची चर्चा आहे. आता शिर्डी येथे दर्शनासाठी गेलेल्या सुरेश रैनाबरोबर केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची मुलगी पूर्णा पटेल दिसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

    भारतीय संघातील अनेक खेळाडूंची नावे आतापर्यंत अभिनेत्री, मॉडेल यांच्याशी जोडली गेलेली आहेत. सुरेश रैना यापासून आतापर्यंत अलिप्त होता. मात्र, आता रैनाही पूर्णा पटेल हिच्याबरोबर थेट साईबाबांचे दर्शन घेताना दिसला आहे. युवराज सिंग, विराट कोहली यांना अनेक युवतींबरोबर पाहण्यात आले आहे. वेस्टइंडीज दौऱ्याहून परतल्यानंतर रैनाने पूर्णा बरोबर लग्न केले, तर ते आर्श्चयाचे ठरणार नाही.

Trending