सराव सामन्यातील शतकाने / सराव सामन्यातील शतकाने रैनाने केली संघातील दावेदारी मजबूत

वृत्तसंस्था

Jul 17,2011 05:30:29 PM IST

टांटन - मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैनाने सॉमरसेटविरुद्धच्या सराव सामन्यात शतक करून पहिल्या कसोटीसाठी संघातील आपली दावेदारी मजबूत केली आहे. युवराज सिंह आणि सुरेश रैना यांच्यात संघात समावेशाबाबत स्पर्धा सुरु आहे.

सॉमरसेटने पहिल्या डावात धावांचा डोंगर उभा केल्यानंतर भारताची दुसऱ्या दिवसाखेर ८ बाद १३२ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर रैनाने आगोदर अमित मिश्रा आणि नंतर श्रीसंतबरोबर संघाचा डाव सावरत संघाला दोनशे धावांचा टप्पा पार करून दिला. रैनाने १०३ धावांची खेळी केली. त्याने वेस्टइंडीजविरुद्धच्या मालिकेतही चांगली कामगिरी केली होती. या सराव सामन्यात आजारपणानंतर सहभागी झालेल्या युवराज सिंहला भोपळाही फोडता आला नाही. रैनाने कठीण परिस्थितीत शतकी खेळी करून आपली दावेदारी सिद्ध केली आहे. भारतीय संघात वरिष्ठ खेळाडूंचा पुन्हा समावेश झाल्याने एका जागेसाठी युवराज आणि रैनामध्ये स्पर्धा असणार आहे.
follow us on twitter @ Divyamarathiweb

X
COMMENT