आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suresh Raina Completed Four Thousand Runs In One Day

सुरेश रैनाच्‍या चार हजार धावा पूर्ण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्मशाला- टीम इंडियाचा डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने इंग्‍लंडविरूद्धच्‍या पाचव्‍या आणि शेवटच्‍या एकदिवसीय सामन्‍यात आपल्‍या चार हजार धावा पूर्ण केल्‍या. चार हजार धावा पूर्ण करणारा तो टीम इंडियाचा 13 वा फलंदाज ठरला आहे.

रैनाने ख्रिस वोक्‍सच्‍या चेंडूवर दोन धावा काढून आपल्‍या कारकीर्दीतील हा महत्‍वाचा टप्‍पा गाठला. रैनाने 159 व्‍या सामन्‍यात ही कामगिरी केली. त्‍याच्‍यापूर्वी या मालिकेतच विराट कोहलीनेही एकदिवसीय क्रिकेटमधील चार हजार धावांचा टप्‍पा ओलंडला होता.

या सामन्‍यापूर्वी रैनाच्‍या नावावर 158 सामन्‍यात 36.55 च्‍या सरासरीने 3985 धावांची नोंद होती. त्‍याशिवाय रवींद्र जडेजानेही आपल्‍या 11 धावा केल्‍यानंतर एक हजार धावांचा टप्‍पा गाठला. या धावा त्‍याने 65 व्‍या सामन्‍यात केल्‍या.