आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suresh Raina Has Always Been A Class Act In Shortest Format,says Sourav Ganguly

सुरेश रैनावर विश्वास होताच : सौरव गांगुली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीरपूर - टी-20 चा फलंदाज म्हणून सुरेश रैनाच्या क्षमतेवर प्रश्न निर्माण केले जाऊ शकत नाही. माझा नेहमी त्याच्यावर विश्वास होताच. सध्याच्या आयसीसी टी-20 स्पध्रेतील यशाने त्याचा आत्मविश्वास वाढेलच, असे मत टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले. रैनाने सध्याच्या स्पध्रेत दोन सराव सामन्यांसह एकूण चार लढतीत 41, 54, नाबाद 35 आणि नाबाद एक धाव काढली. त्याने या यशाचे र्शेय सौरव गांगुलीला दिले. गांगुलीने त्याला काही खास टिप्स दिल्या होत्या.

गांगुली म्हणाला, ‘मला सुरेश रैनाची प्रतिमा आणि योग्यतेवर पूर्वीपासूनच विश्वास होता. तो टी-20 साठी खतरनाक फलंदाज आहे. तो कोणत्याही संघासाठी धोकादायक ठरू शकतो. आयसीसी टी-20 मधील सध्याचा फॉर्म पुढच्या मोठय़ा स्पर्धांतही तो कायम ठेवेल, याचा मला विश्वास आहे.’

युवराजही फॉर्मात येईल
सौरव गांगुली सुरुवातीला युवराजसिंगचा मेंटर होता. गांगुलीच्या मते डावखुरा फलंदाज युवराजसिंगच्या फॉर्माबाबत चिंता करायची गरज नाही. युवराजने सध्याच्या केवळ दोन सामन्यांत धावा केलेल्या नाहीत. ही फार मोठी गोष्ट नाही. तोसुद्धा माणूस आहे. अडचणीच्या काळातून तोसुद्धा जाऊ शकतो. त्याच्यात यातून बाहेर पडण्याची प्रतिभा आणि कुशलता आहे. आघाडीच्या स्तरावर 14, 15 वष्रे खेळून फॉर्म हरवला नाही, असा मला एक तरी खेळाडू शोधून दाखवा. खेळात असे होतच असते. युवी लवकरच फॉर्मात येईल, असे दादाने म्हटले.