आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suresh Raina May Captain Team India In Bangladesh News In Hindi

धोनी, कोहली नव्हे तर रैना बनणार वनडे टीमचा कर्णधार, निवड समितीचे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयपीएलनंतर लगेचच टीम इंडिया बांगलादेशच्या दौ-यावर जाणार आहे. तेथे भारत बांगलादेशदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि विरोट कोहली याला आराम देण्याचे संकेत निवड समितीने दिले आहेत. त्यामुळेच रैनाला कर्णधार केले जाण्याची शक्यता आहे.
मेच्या अखेरिस या मालिकेची घोषणा केली जाणार असून, बेंगळुरूमध्ये संघ निवडला जाईल असे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी गुरुवारी सांगितले. या दौ-यामध्ये 15 ते 19 जूनदरम्यान तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. दौ-यासाठी भारतीय संघ 13 जूनला रवाना होईल. तर 20 जूनला संघ परतणार आहे.

इंग्लंड दौ-यापूर्वी विश्रांती?
जुलैमध्ये भारत इंग्लंड दौ-यावर जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर धोनी आणि कोहलीला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. टीम इंडिया इंग्लंडमध्ये प्रथमच पाच कसोटी आणि पाच एकदिवसीय सामन्यांच्या मोठ्या दौ-यावर जात आहे.

... तर रैना बनणार कर्णधार
निवड समितीने धोनी आणि कोहलीला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला तर बांगलादेश दौ-यासाठी संघाजी जबाबदारी सुरेश रैनाच्या खांद्यावर टाकली जाऊ शकते.

पुढे वाचा...कशी आहे कर्णधार म्हणून रैनाची कामगिरी