आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरेश रैनाचे आयपीएल सामन्यांचे ‘शतक’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - चेन्नई सुपर किंग्जचा स्टार फलंदाज सुरेश रैनाने आयपीएल-7 मध्ये अनोखे शतक झळकावले. त्याने शुक्रवारी चेन्नई सुपरकिंग्जकडून करिअरमधील 100 वा सामना खेळला. यासह त्याने सात सत्रांत 100 सामने खेळण्याचा विक्रमही आपल्या नावे केला. अशा प्रकारे सामन्यांचे शतक झळकावणारा सुरेश रैना हा पहिला क्रिकेटपटू ठरला.

सुरेश रैना आयपीएलमध्ये सलग सातव्या सत्रात चेन्नई सुपरकिंग्जचे प्रतिनिधित्व करत आहे. चेन्नई सुपरकिंग्जने या फलंदाजाला आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेपूर्वीच रिटेन केले होते. रैनाने आतापर्यंत 99 सामन्यांत 35.02 च्या सरासरीने आणि 141.37 च्या स्ट्राइक रेटने एकूण 2802 धावांचा पल्ला गाठला आहे. यासह आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणारा रैना हा एकमेव खेळाडू ठरला. आता आयपीएलमध्ये सामन्यांचे शतक पूर्ण करण्यासाठी अनेक खेळाडू उत्सुक आहेत. यात रोहित शर्मा (98 सामने), महेंद्रसिंग धोनी (97 सामने) देखील सज्ज आहेत.

चेन्नईचेही शतक
आयपीएलच्या सातव्या सत्रापर्यंत चमकदार कामगिरीसह चेन्नई सुपरकिंग्जने अनोखे शतक आपल्या नावे केले. या टीमने आतापर्यंत आयपीएलमध्ये 100 सामने खेळले आहेत. ही उल्लेखनीय कामगिरी करणारा चेन्नई संघ एकमेव आहे. यासह चेन्नईने दोन वेळा (2010, 2011) आयपीएलचा किताबही पटकावला आहे.