आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • \'Surprised\' Chappell Denies Tendulkar\'s Claims

सचिन तेंडुलकर खोटारडा, कर्णधार बनवण्याचा विचारही नव्हता, चॅपल गुरुजींचा पलटवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/सिडने- भारतीय क्रिकेट संघाचे वादग्रस्त ठरलेले माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला खोटारडा म्हणून संबोधले आहे. तसेच सचिनने केलेले सर्व आरोप चॅपल यांनी फेटाळले आहेत.

2007 च्या विश्वचषकापूर्वी राहुल द्रविड याच्या ऐवजी सचिनला कर्णधार बनवण्याची आपली इच्छा नव्हती. सचिन खोटे बोलत असल्याचे चॅपल यांनी म्हटले आहे.

चॅपल म्हणाले, सचिन खोटे बोलत आहे. मी केवळ एकदाच त्याच्या घरी गेलो होतो. तेव्हा त्याला पाहायला गेलो होतो. सचिनला दुखापत झाली होती. विशेष म्हणजे यावेळी माझ्यासोबत फिजियो आरि असिस्टेंट कोच होते. राहुल द्रविडला कर्णधार पदावरून हटवून सचिनला कर्णधार बनवण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती.

'प्लेइंग इट माय वे' चॅपेल गुरुजी करायचे दादागिरी, सचिनने घेतला समाचार

दरम्यान, सचिन तेंडुलकरने जीवनचरित्र 'प्लेइंग इट माय वे' येत्या सहा नोव्हेंबरला प्रकाशित होत आहे. त्यापूर्वीच पुस्तकातून काही महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत. सचिनने आपल्या पुस्तकात ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार आणि टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपलवर टीका केली आहे.

2007च्या विश्वचषकापूर्वी राहुल द्रविडला हटवून सचिन तेंडुलकरला कर्णधार बनवण्याची ग्रेग चॅपल यांची इच्छा होती, असे सचिनने आपल्या पुस्तकात म्हटले आहे. क्रिकेटचा देव अशी उपमा मिळालेल्या सचिनने चॅपल यांचा उल्लेख करत म्हटले आहे की, ग्रेग चॅपल संघावर आपले विचार थोपवत होते.

चॅपल सांगतील तीच पूर्व दिशा असायची. सगळ्या क्रिकेटपटूंना चॅपल यांचेच ऐकावे लागत होते. चॅपल यांचे चुकीचे निर्णय देखील क्रिकेटपटूंनी मान्य करावे, अशीच त्यांची अपेक्षा होती. चॅपेल यांची दादागिरी कोणत्याही खेळाडुला आवडत नव्हती त्यामुळे खेळाडुंमध्ये वाद वाढले होते, असेही सचिनने लिहिले आहे.