आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushil Kumar Ring Ceremony Photos, Won Gold Medal In Glasgow, News In Marathi

कुस्‍तीगीर सुशील कुमार पत्नीला न पाहताच लग्‍नास झाला होता तयार, भेट थेट साखरपुड्यात!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिसार - नुकत्‍याच सुरु असलेल्‍या ग्‍लासगो राष्‍ट्रकुल स्‍पर्धेमध्‍ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा कुस्‍तीगीर सुशील कुमारचे वैवाह‍ीक आयुष्‍य मोठे मजेदार आहे. 2010 च्‍या राष्‍ट्रकुल स्‍पर्धेमध्‍ये सुवर्णपदक जिंकल्‍यानंतर त्‍याने गुरुवर्य द्रोणाचार्य पुरस्‍कार प्राप्‍त महाबली सतपाल यांची मुलगी सावी सोबत विवाह केला. उल्‍लेखनिय म्‍हणजे सुशील कुमारने साखरपुड्यापूर्वी मुलीला कधी बघितलेसुध्‍दा नव्‍हते.
एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्‍या मुलाखतीमध्‍ये सुशीलकुमारने मनमोकळ्या गप्‍पा मारल्‍या होत्‍या. त्‍याला लव्‍ह मॅरेज विषयी विचारणा करताच त्‍याने हे अरेंज मॅरेज असल्‍याचे स्‍पष्‍ट केले होते. सुशील मल्‍लविद्येचे गुरु महाबली सतपालकडे जात असे. पण त्‍याने एकदाही सावी बघितले नव्‍हते. सुशील अत्‍यंत लाजाळू असून त्‍याला जुळे मुले आहेत. साखरपुड्याच्‍यावेळी त्‍याने सावीला हीरे जडीत अंगठी भेट केली होती.
सुशील म्‍हणाला की, भलेही लग्‍नापूर्वी आम्‍ही भेटलो नसलो तरी आमचे वैवाहीक जीवन अगदी आनंदात जात आहे. आमच्‍यामध्‍ये चांगले ऋणानुबंध आहेत.
लग्‍नामध्‍ये दिग्‍गजांची उपस्थिती
सुशील आणि सावीच्‍या लग्‍नाला राजकीय तसेच क्रीडा जगतातील कित्‍येक दिग्‍गजांची उपस्थिती होती. त्‍यामध्‍ये कॉंग्रेस उपाध्‍यक्ष राहुल गांधी, सद्यस्थितीतील गृहमंत्री राजनाथ सिंह, ऑस्‍कर फर्नांडिस, माजी कर्णधार कपिल देव, हॉकीचा माजी कर्णधार जफर इक्‍बाल, जलतरणपटू खजान सिंह, कुस्‍तीतील कित्‍येक कोच आणि मल्‍ल उपस्थित होते.
पुढील स्‍लाइडवर पाहा, सुशील कुमारच्‍या लग्‍नाची छायाचित्रे..