आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushilkumar And Yogeshwar Datt News In Marathi, Rashtrakul Competition

कुस्तीपटूंना पदकांची आशा; सुशील कुमार, योगेश्वर दत्त पदकासाठी सज्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेतील ग्रीकोरोमनच्या 19 पदकांपैकी 7 पदके पटकावणार्‍या भारतीय मल्लांपुढे यंदाच्या स्पर्धेत अनेक समस्या आहेत. भारताचे प्रमुख मल्ल राष्ट्रकुलमध्ये खेळत आहेत. तसेच तयारीत असलेल्या इतर मल्यांनादेखील पदकांची आशा आहे.
भारताचा दोनवेळचा ऑलिम्पिकपदक विजेता सुशीलकुमार आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्त हे दोघेही भारतीय मल्लांचे नेतृत्व करीत आहेत. प्रदीर्घ काळापासून हे दोघेही आंतरराष्ट्रीय कुस्तीपासून दूर असल्याने त्यांना रॅँकिंग मिळालेले नाही. मात्र, त्यांचा अनुभव आणि ऑलिम्पिकमधील कामगिरीचा दबदबा मोठा आहे. नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुशीलकुमारने 74 किलो गटात रौप्य, तर योगेश्वरने 65 किलो गटात सुवर्णपदक पटकावत त्यांच्यात पूर्वीइतकाच दम असल्याचे सिद्ध केलेले आहे. भारताचे अन्य खेळाडूदेखील सर्वोत्कृष्ट असून ते दमदार कामगिरी करतील, असा विश्वास फेडरेशनने केला आहे. स्कॉटलंड येथे होणार्‍या स्पर्धेत सुशील कुमार आणि योगेश्वर दत्तकडुन उल्लेखनिय कामगिरीची आशा आहे.