आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swamy Army Requests CA To Play Sachin Tendulkar Song During World Cup

सचिनवरील विशेष गीत वाजवण्यासाठी चाहत्यांचा दबाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -
‘सचिन ना थकेगा कभी...
सचिन ना थमेगा कभी...
सचिन ना मुडेगा कभी...
होगा यही...
हंड्रेड शतक... हंड्रेड शतक... हंड्रेड शतक... ’
असे शब्द आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये ऐकू आल्यास आश्चर्य वाटू देऊ नका.
ऑस्ट्रेलियन संगीतकार फिल जाय यांनी आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी सचिन तेंडुलकरवर विशेष गीत लिहिले आहे. ते गीत सिडनी येथे होणार्‍या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीदरम्यान प्रेक्षकांना ऐकवा, अशी मागणी सचिनच्या ऑस्ट्रेलियातील ‘फॅन ग्रुप’ने केली आहे.

स्वामी आर्मी आणि अन्य सचिनप्रेमी ऑस्ट्रेलियन भारतीयांनी सचिनची आयसीसीने विश्वचषक २०१५चा राजदूत म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सचिनवरील या विशेष गीताची धून सिडनी कसोटीदरम्यान वाजवावी, अशी विनंती क्रिकेट ऑस्ट्रेलियाला केली आहे. ‘सचिन तेंडुलकर-गॉड ऑफ क्रिकेट’ असे हे सचिन गीत २०१३ मध्ये मार्च महिन्यात लिहिले गेले होते. त्याच वर्षी सचिनने नोव्हेंबर महिन्यात जेव्हा निवृत्ती जाहीर केली तेव्हा हेच गीत व्यावसायिक नीतिमूल्ये जपून पुन्हा ‘रेकॉर्ड’ करण्यात आले.

सध्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला यश मिळत नाही. त्यामुळे सचिन तेंडुलकरवर तयार करण्यात आलेले हे गीत भारतीय खेळाडूंसाठी प्रेरक शक्ती ठरेल, असाही विश्वास स्थानिक भारतीयांना वाटत आहे.