आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लंडन- स्वानसा सिटीने इंग्लिश प्रीमियर फुटबॉल लीगमध्ये शानदार एकतर्फी विजय मिळवला. या टीमने लढतीत कार्डिफ सिटीचा 3-0 अशा फरकाने पराभव केला. गुणतालिकेत दहाव्या स्थानी असलेल्या स्वानसा सिटीचा लीगमधील हा सातवा विजय ठरला. तसेच कार्डिफ सिटीला लीगमध्ये 14 व्या पराभवाला सामोरे जावे लागले. रोउल्टेडगे (47 मि.), डायर (79 मि.) आणि बोनी (85 मि.) यांनी केलेल्या गोलच्या बळावर स्वानसा सिटीने सामना जिंकला.
ही लढत 46 मिनिटे शून्य गोलने बरोबरीत खेळवली गेली. अखेर 47 व्या मिनिटाला रोउल्टेडगेने सामन्यात गोलचे खाते उघडले. यासह स्वानसाने लढतीत 1-0 ने आघाडी मिळवली. त्यानंतर डायरने स्वानसाच्या आघाडीला 2-0 ने मजबूत केले. त्याने सामन्याच्या 79 व्या मिनिटाला मैदानी गोल केला.
सामन्याच्या शेवटच्या पाच मिनिटांत बोनीने लढतीत तिसरा गोल केला. त्याने 85 व्या मिनिटाला ही किमया साधली. यासह त्याने सामन्यात स्वानसा सिटीचा एकतर्फी विजय निश्चित केला.
स्टोकने साऊथम्पटनला बरोबरीत रोखले
क्रोऊचने केलेल्या निर्णायक गोलच्या बळावर स्टोक सिटीने रंगतदार लढतीत साऊथम्पटनला 2-2 ने बरोबरीत रोखले. त्याने सामन्याच्या 44 व्या मिनिटाला ही शानदार कामगिरी केली. ओडेमविगिईने (38 मि.) स्टोक सिटीकडून गोलचे खाते उघडले होते. तत्पूर्वी, सहाव्या मिनिटाला लार्बेटने साऊथम्पटनसाठी पहिला गोल केला. त्यानंतर 41 व्या मिनिटाला डेव्हिसने दुसरा गोल केला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.